AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात घामामुळं सुटणारी दाढीतील खाज घालवण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ उपाय

त्वचेला खाज सुटण्याची कारणे आणि उपचार,दाढी वाढताना खाज सुटणे कसे थांबवायचे?,खाज सुटण्यासाठी कोणते घरगुती उपाय आहेत?,अंगाला खाज येत असेल तर कोणते उपाय सांगता येतील?

उन्हाळ्यात घामामुळं सुटणारी दाढीतील खाज घालवण्यासाठी घरच्या घरी करा 'हे' उपाय
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Mar 30, 2025 | 11:24 AM
Share

उन्हाळ्यात उष्णतेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, ज्या मध्ये घाम येणे, खाज सुटणे आणि घामोळ्या येणे यासारख्या समस्यांचा समावेश आहे. त्यातच दाढी असणाऱ्यांना दाढीत खाज सुटणे हा एक मोठा त्रास होतो. हा असह्य त्रास अनेकदा चीडचीड आणि अस्वस्थतेचं कारण बनतो.

तुम्हालाही दाढीमध्ये खाज सुटते का? जर हो, तर या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे तुम्ही दाढीतील खाज कमी करू शकता आणि दाढीची देखभाल सोप्प्या पद्धतीने करू शकता. चला, जाणून घेऊया दाढीतील खाज कमी करण्याचे उपाय!

1. मॉइश्चरायझ करा

दाढी ठेवणाऱ्यांसाठी मार्केटमध्ये विविध प्रकारचे ऑईल उपलब्ध आहेत, तसेच दाढीसाठी खास मॉइश्चरायझर देखील मिळतात. या मॉइश्चरायझरचा वापर तुम्ही दाढीवर नियमितपणे करावा. यामुळे दाढीची त्वचा ओलसर राहते आणि पाण्याच्या किंवा घामामुळे होणारी खाज कमी होण्यास मदत मिळते.

2. दाढीचा शॅम्पू वापरा

बाजारात दाढी स्वच्छ करण्यासाठी खास शॅम्पू उपलब्ध आहेत. दाढीच्या देखभालीसाठी याचा वापर करा. आठवड्यात तीन वेळा शॅम्पूने दाढी धुतल्यास खाज कमी होईल आणि दाढी स्वच्छ राहील. जर दाढीची स्वच्छता करूनही खाज जाणवत असेल, तर लिंबाच्या पानांचा वापर करा. लिंबाच्या पानांची पेस्ट तयार करा आणि ती पेस्ट दाढीवर लावा. काही वेळाने चेहरा धुऊन काढला तर तुम्हाला खाज कमी झालेली दिसेल.

3.एलोव्हेरा जेल

दाढीतील खाज कमी करण्यासाठी एलोव्हेरा जेल एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ताज्या एलोव्हेरा जेलला दाढीवर लावा. तुम्ही ते जेल रात्रभर लाऊन झोपू शकता, यामुळे त्वचेची जळजळ कमी होईल आणि खाज शांत होईल. या लेखातील माहिती सामान्य माहितीनुसार आहे. याचा उद्देश वाचकांना माहिती आणि जागरूकता वाढवणे आहे. आम्ही या लेखातील माहितीबद्दल कोणताही दावा करत नाही आणि जबाबदारी घेत नाही. त्वचेच्या कोणत्याही समस्येसाठी, कृपया विशेषज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....