AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बर्ड फ्लूचा कहर, 4 लाख कोंबड्या आणि 24 लाख अंडी नष्ट, केंद्रीय पथक होणार दाखल…

नंदूरबारच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूने कहर केला असून आता पर्यंत तिसऱ्या येथे बर्ड फ्लुचा शिरकाव झाला आहे. काय आहे नेमकी येथील परिस्थिती पाहूयात....

| Updated on: May 17, 2026 | 4:43 PM
Share
नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहे. आतापर्यंत ४ लाख ६ हजार कोंबड्या आणि कलिंग  २४ लाख ९१ हजार अंडी आणि मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.या मोठ्या नुकसानीची केंद्र सरकारने दखल घेतली असून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात केंद्रीय पथक नवापूरमध्ये दाखल होणार आहे. पाहूया यावरील टीव्ही ९ मराठी चॅनलचे प्रतिनिधी जितेंद्र बैसाणे यांचा सविस्तर रिपोर्ट..

1 / 5
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. नवापूरमधील ९ पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर केंद्रीय पथक आता पुढच्या आठवड्यात नवापूरमध्ये दाखल होणार आहे.लाखोंची अंडी आणि खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आल्याने पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिकांनी अधिक मदतीची मागणी केली आहे.

2 / 5
 नवापूरमधील हा बर्ड फ्लूचा हा तिसरा प्रादुर्भाव असून यापूर्वी २००६ आणि २०२१ मध्येही अशा घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा बर्ड फ्लूने पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका दिला आहे. आतापर्यंत ९ पोल्ट्री फार्मचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, या बाधित फार्मच्या परिसरातील १५ पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

3 / 5
 बाधित पोल्ट्री फार्ममधील नुकसानग्रस्तांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार असून, प्रति कोंबडी १४० रुपये, प्रति अंडे ४ रुपये आणि प्रति किलो खाद्यपदार्थासाठी २५ रुपये मदत देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी पक्षी नष्ट केले  आहेत, त्या परिसराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त संजय खाचने यांनी म्हटले आहे.

4 / 5
 बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रादुर्भावाची आणि झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी आता केंद्रीय पथक नवापूरमध्ये दाखल होणार आहे. या पथकाच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून पुढील उपाययोजना आणि मदतीबाबत काय निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5 / 5
Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी

MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?