AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिला शो गेला हातातून, पण हार मानली नाही; आज लोकप्रिय कलाकार, आवाजाचीही जादू !

अभिनेता शरद केळकर गेल्या दोन दशकांपासून फिल्म आणि टीवी इंडस्ट्रीचा भाग आहे. त्याच्या आवाजाच्या जादूने ते फॅन्सचे फेवरेट झाले. तरीही, त्यांच्यासाठी गोष्टी नेहमी सोप्या नव्हत्या. पहिल्यांदा एका मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम मिळाल्यानंतर त्यांना एका दिवशी काढण्यात आलं.

| Updated on: Oct 07, 2026 | 5:25 PM
Share
अभिनेता, व्हॉइस-ओव्हर आर्टिस्ट आणि दमदार व्यक्तिमत्त्व म्हणून शरद केळकर याने मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज, 7 ऑक्टोबरला तो 50 वर्षांचा झालाय. शरद केळकरने आपल्या अभिनय कारकिर्दीला 2004 साली टेलिव्हिजनपासून सुरुवात केली. त्यानंतर टीव्ही, बॉलिवूड, वेब सीरिज आणि प्रादेशिक सिनेमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली. मात्र हे यश त्याला सहज मिळालं नाही. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

1 / 8
शरदच्या आयुष्यातील एक कटू अनुभव २००३ मध्ये आला. तब्बल अडीच ते तीन वर्षांच्या स्ट्रगलनंतर त्याला पहिला टीव्ही शो मिळाला. मोठ्या प्रॉडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तो प्रचंड उत्साहित होतो. मात्र ही संधी फार काळ टिकली नाही. एका मुलाखतीत शरदने सांगितलं होतं की, त्या काळात त्याला अभिनयाचा फारसा अनुभव नव्हता. पहिल्याच सीनसाठी दिग्दर्शकाने तब्बल ३०-४० टेक घेतले. मात्र शरदला अपेक्षेप्रमाणे परफॉर्म करता आलं नाही.

2 / 8
शरदला त्या दिवशी मोठा धक्का बसला. दिवसभराच्या शूटिंगनंतर निर्मात्यांनी त्याला शोमधून रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला.  शरदने सांगितलं होतं की, इतक्या वर्षांच्या स्ट्रगलनंतर मिळालेला पहिला चांगला शो अशा प्रकारे हातातून गेल्याने त्याला खूप वाईट वाटलं. आज मागे वळून पाहताना शरद केळकर या प्रसंगाला आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट मानतो. या घटनेने त्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकवली—आयुष्यात कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. त्यासाठी मेहनत, सातत्य आणि स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो.

3 / 8
शरद केळकरे त्या अपयशाने खचून न जाता स्वतःला अधिक चांगलं करण्यासाठी मेहनत घेतली. सतत प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा त्याला याच अनुभवातून मिळाली. पुढे त्याने टेलिव्हिजनवर अनेक भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

4 / 8
टेलिव्हिजनवर लोकप्रिय झाल्यानंतर शरदने सिनेमांकडे मोर्चा वळवला. ‘हलचल’ आणि ‘1920: इव्हिल रिटर्न्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. सुरुवातीला छोट्या भूमिका मिळाल्या, मात्र त्याचा संघर्ष सुरूच राहिला. संजय लीला भन्साळी यांच्या २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटातील भूमिकेमुळे शरद केळकरला मोठी ओळख मिळाली. यानंतर त्याच्या अभिनय कारकिर्दीला नवी दिशा मिळाली.

5 / 8
शरद केळकर हा केवळ अभिनेता नाही, तर एक प्रसिद्ध व्हॉइस-ओव्हर आर्टिस्टही आहेत. विशेष म्हणजे लहानपणी हकलण्याची समस्या असलेल्या शरद यांनी आपल्या आवाजालाच पुढे करिअरची ताकद बनवलं.

6 / 8
‘बाहुबली’ फ्रँचायझीच्या हिंदी आवृत्तीत प्रभासच्या व्यक्तिरेखेला शरद केळकर यांनी आवाज दिला. त्यांचा दमदार आवाज प्रेक्षकांच्या इतका पसंतीस उतरला की डबिंगच्या क्षेत्रातही त्यांनी स्वतःची मोठी ओळख निर्माण केली. प्रभासच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीतही शरद केळकर यांनी आवाज दिला. अभिनयासोबतच त्यांच्या आवाजाची वेगळी फॅन फॉलोइंग निर्माण झाली आहे.

7 / 8
 पहिल्याच शोमधून रिप्लेस होणाऱ्या शरद केळकर याने कधीही हार मानली नाही. आज तो अभिनेता, डबिंग आर्टिस्ट आणि लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो.

8 / 8
Follow Us
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी

MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...