AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरबा सुरू होण्याआधीच नवा वाद! विश्व हिंदू परिषदेची मोठी मागणी; कडक नियम लागू होणार?

Vishwa Hindu Parishad On Garba: गरबा मंडपात अश्लील गाणी-चित्रफितींना बंदीची मागणी करण्यात आली आहे. महिला सुरक्षेवरून विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे.

गरबा सुरू होण्याआधीच नवा वाद! विश्व हिंदू परिषदेची मोठी मागणी; कडक नियम लागू होणार?
| Updated on: Oct 07, 2026 | 6:09 PM
Share

देशभरात शारदीय नवरात्रीची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही देवीच्या भव्य मूर्ती आणि मंडप उभारले जात आहेत. राज्यात गरबा आणि रासचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे. गुजरातच्या भावनगरमधून पारंपरिक गरबा आणि रासचे पोशाख खास मागवण्यात आले आहेत. ते खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी आधीच जमली आहे. मात्र आता भंडाऱ्यात गरबा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यामुळे विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहेत. याविरोधात त्यांनी एक मोठी मागणी केली आहे.

या प्रकरणी विश्व हिंदू परिषदेने सांगितले की, गरबाोत्सवात अश्लील गाण्यांवर बंदी आणा. तसेच महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी पालकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गरबा उत्सवात महिलांच्या सुरक्षेसाठी विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आयोजकांना कठोर नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. लव्ह जिहादच्या पार्श्वभूमीवर गरब्यात कडक नियमांची विश्व हिंदू परिषदेने मागणी केली आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे. तसेच या नियमांमुळे तरुणांच्या उत्साहावर परिणाम होणार आहे.

११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गरबा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी भंडाऱ्यात विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्तीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. गरबा आयोजकांनी कोणतीही अश्लील गाणी किंवा चित्रफीत न वाजवण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. सध्या लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये हिंदू महिला आणि मुलींना प्रामुख्याने लक्ष्य केले जात आहे.

विश्व हिंदू परिषदेने सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडिओ शेअर करून मुलींना आकर्षित केले जाते. त्यानंतर त्यांना जाळ्यात ओढले जाते. मुलींच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवावे आणि त्यांच्याशी संवाद साधावा. गरब्याचे आयोजन करणाऱ्यांनी व पालकांनी मुलींच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असं सांगण्यात आले आहे. आता यावर प्रशासन काय निर्णय घेणार, याकडे लक्ष असणार आहे.

Follow Us
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?