Weight Loss | थंडीत वजन कमी करण्यासाठी या ‘7’ गोष्टी नक्की खा!

या हंगामात लोकांना गरम-गरम गाजरचा हलवा, गुलाब जाम, सरसो दा साग आणि हॉट चॉकलेट खाण्याला पसंती देतात.

Weight Loss | थंडीत वजन कमी करण्यासाठी या ‘7’ गोष्टी नक्की खा!
वाढलेले वजन
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 4:05 PM

मुंबई : हिवाळ्याच्या मौसमात (Winter) अधिकची भूक लागत असल्याने, गरम आणि स्वादिष्ट खाण्यापासून दूर राहणे खूप अवघड होते. या हंगामात लोकांना गरम-गरम गाजरचा हलवा, गुलाब जाम, सरसो दा साग आणि हॉट चॉकलेट खाण्याला पसंती देतात. हिवाळ्यात लोकांची खाण्याची (Food) क्षमता वाढते, असे अनेक संशोधानात सिद्ध झाले आहे. याचमुळे हिवाळ्याच्या हंगामात वजन कमी (Weight Loss) करण्याऱ्यांची संख्याही अधिक असते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आहारातील काही गोष्टी केवळ हिवाळ्यात वजन कमी करण्याचे कार्यच नव्हेतर, पण पोटातील चरबी कमी करण्यासदेखील खूप प्रभावी ठरतात.(Food for weight loss in winter)

गाजर

फायबरने समृद्ध असलेले गाजर पचनास तसे जड असते. यामुळेच गाजर खाल्ल्यानंतर आपल्याला तासन् तास भूक लागत नाही. स्वाभाविकच, एखाद्या व्यक्तीला भूक नसल्यास त्याचे वजन आपोआप कमी होईल. दुसरे म्हणजे, गाजरामध्ये कॅलरीचे प्रमाण अगदी कमी असते आणि गाजर नॉन-स्टार्की असल्यामुळे वजन देखील वाढत नाही.

बीट

बीटरूटमध्ये वजन कमी करण्यासाठी अनुकूल असे फायबर घटक आढळतात. 100 ग्रॅम बीटामध्ये केवळ 43 कॅलरी असतात. हे पोषक घटक त्वरेने वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात. (Food for weight loss in winter)

दालचिनी

स्वयंपाकघरात वापरली जाणारी दालचिनी हिवाळ्यात वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. जर्नल ऑफ न्यूट्रिशनल सायन्स अँड व्हिटॅमिनोलॉजीनुसार, दालचिनीत असलेले सिन्नॅल्डेहाइड चयापचयाची क्रिया संतुलित करते. तसेच, इन्सुलिनची पातळी देखील नियंत्रणात ठेवते. शरीरात साखरेचे प्रमाण वाढले की एखाद्याचे वजन वेगाने वाढू लागते.

मेथीचे दाणे

हिवाळ्याच्या काळात वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे अतिशय प्रभावी ठरतात. मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात आणि इन्सुलिनचा स्राव वाढवतात. हे केवळ आपल्या चयापचय प्रणालीस चांगल्या स्थितीत ठेवत नाही तर, त्यामध्ये आढळणारा ग्लॅक्टोमनन भूक नियंत्रित करण्यास उपयुक्त आहे.(Food for weight loss in winter)

पेरू

गाजराप्रमाणेच पेरूदेखील पचनास जड असतो. त्यामुळे हिवाळ्यात चवदार पेरू अनेक तासांच्या भुकेवर नियंत्रण ठेवू शकतो. एक पेरू आपल्या शरीराला आवश्यक असलेल्या फायबरची गरज 12 टक्के पर्यंत पूर्ण करू शकतो. हे फळ चयापचयसाठी देखील फायदेशीर आहे. चांगली पचनक्रिया वजन कमी करण्यास मदत करते.

गरम पाणी/हर्बल चहा

हिवाळ्यात पाण्याअभावी शरीर डी-हायड्रेट होण्याचा धोका वाढतो. डिहायड्रेशनमुळे चयापचय प्रणाली प्रभावित होते. या हंगामात गरम पाणी किंवा हर्बल टी आपल्या शरीराला केवळ हायड्रेट ठेवण्याचेच काम करत नाही तर, बर्‍याच काळासाठी भूक देखील नियंत्रित करतात.(Food for weight loss in winter)

ताज्या भाज्या

हिवाळ्यात बरेचदा लोक पॅक्ड फूड वापरतात किंवा अन्नावर प्रक्रिया करतात. मात्र, अशा प्रकारच्या अन्नामध्ये सोडियम आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे वजन वेगाने वाढते. म्हणून पॅकेटेड सूप, सॉस किंवा प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ खाण्यापेक्षा आहारात ताज्या भाज्यांचा आणि अन्नपदार्थांचा समावेश करा.

(Food for weight loss in winter)

(टीप : उपचारांपूर्वी अथवा अधिक माहितीसाठी नेहमी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

हेही वाचा :

व्यायाम न करताही फिटनेस ठेवण्यासाठी 5 महत्त्वाच्या टिप्स

दिवाळीत गोड पदार्थ खाऊनही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स

कॉफीसोबत ‘हे’ तेल घ्या आणि लठ्ठपणापासून सूटका मिळवा!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.