Stress Relief Tips- अशा प्रकारे ताणतणाव करा दूर, फॉलो करा ‘या’ टिप्स

'या' टिप्स फॉलो करा ताणतणाव कमी होईल. (Get rid of stress in this way, follow these tips)

  • Updated On - 7:06 pm, Sun, 10 January 21
Stress Relief Tips- अशा प्रकारे ताणतणाव करा दूर, फॉलो करा 'या' टिप्स
तणाव कमी करण्यासाठी आणि मनःस्थिती सुधारण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश

मुंबई: ऑफिस किंवा घरात बर्‍याच वेळा असं काही घडतं की डोकं विचार करण्याच्या किंवा समजण्याच्या स्थितीत नसतं. ताणतणाव वाढतो आणि गोष्टी अशा असतात की ज्या प्रत्येकासोबत शेअर केलं जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती स्वत:तच गुदमरतो. कधीकधी चुकीचं पाऊल उचलण्याची इच्छाही त्यांच्या मनात येऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही युक्त्या सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही मनाचा राग काळजीशिवाय किंवा टेंशन काढू शकता. यामुळे आपलं मनही ताजंतवानं होईल आणि घुटमळ देखील संपेल.

सिक्रेट डायरी तयार करा मनात येणारे विचार कधीही थांबवू नयेत, कारण ते भविष्यात निराशेचं रूप धारण करतात. हे विचार लिहिण्यासाठी, आपली सिक्रेट डायरी बनवा. जेव्हा जेव्हा तुम्हाला तणाव जाणवेल तेव्हा काळजी न करता या डायरीत त लिहा आणि आपलं मन हलकं करा.

आवडीचं काम करा अनेक वेळा लक्ष दुसरीकडे वळवूनही ताण कमी केला जातो. जर तुम्ही खूप अस्वस्थ असाल तर सतत त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तुम्हाला करायला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये मन गुंतवा. ड्रॉईंग,डान्स ,सिंगींग या गोष्टी तुम्ही करू शकता. ही कामं त्या वेळी तुमच्यासाठी थेरपी ठरेल.

मेडिटेशनची सवय लावा ज्यांना नेहमी ताणतणाव येतो, अशा लोकांनी ध्यानधारणा केली पाहिजे. ध्यान मनाला बळकट करतं आणि प्रत्येक परिस्थिती सहन करण्याची क्षमता वाढवतं. जेव्हा जेव्हा तणाव असेल तेव्हा शांत ठिकाणी थोडा वेळ बसा आणि लांब, लांब श्वास घ्या. असं केल्यानं मेंदूला ऑक्सिजन व्यवस्थित मिळतं आणि तणाव कमी होतो.

आवडत्या ठिकाणी फिरायला जा बाहेर फिरणं बऱ्याच वेळा उपयोगी ठरू शकतं. तुमचं आवडतं ठिकाण असेल त्याठिकाणी जा तुमचं मन हलकं होण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या 

Travel | अवघ्या 1299 रुपयांत हवाई सफर करण्याची शेवटची संधी, पाहा कसे कराल तिकीट बुक?

Diarrhoea | डायरियाच्या समस्येने हैराण? मग, ‘हे’ घरगुती उपाय करून पाहा!

Published On - 7:05 pm, Sun, 10 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI