रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आले आणि मध फायदेशीर, वाचा !

सध्याच्या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे खूप आवश्यक आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आले आणि मध फायदेशीर, वाचा !
आले आणि मध
Follow us
| Updated on: May 16, 2021 | 11:35 AM

मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे खूप आवश्यक आहे. कारण जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असले तरच आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर सर्वांनी भर दिला पाहिजे. आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. (Ginger and honey are beneficial for boosting the immune system)

यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी, आले आणि मध लागणार आहे. सर्वात प्रथम पाणी मंद आचेवर गरम होण्यासाठी ठेवा त्यानंतर त्यामध्ये आद्रक घाला. वीस मिनिटे हे पाणी उकळूद्या आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. हे पाणी गरम आहे तोपर्यंत पिऊन टाका. हे पाणी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे. आद्रक आणि मध पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकारक शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो. खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात. तसेच, मध कफ सहजपणे काढून टाकतो.

आद्रक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात पोटॅशियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यासारखे गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. आयुर्वेदात आद्रकाचे वर्णन अत्यंत उपयुक्त घटक असे आहे. शतकानुशतके आद्रकाच्या चहाचे सेवन केले जात आहे. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट, औषधी आणि उपचारात्मक असे बरेच गुणधर्म आहेत. आद्रकामध्ये आढळणारा फायटोन्यूट्रिएंट जिंजरॉल हा प्रमुख घटक निरोगी सूक्ष्मजंतू तयार करतो आणि आपल्या पाचक समस्यांना प्रतिबंधित करतो.

संबंधित बातम्या : 

चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम, लाल शिमला मिर्ची आणि मासे फायदेशीर, वाचा !

(Ginger and honey are beneficial for boosting the immune system)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.