Spinach Juice Benefits | वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत, उन्हाळ्याच्या दिवसांत पालकाचा रस ठरेल फायदेशीर!

पालकाच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, खनिज, प्रथिने, व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सी सारखे अनेक पोषक द्रव्य असतात. पालकाचा रस संक्रमणाचा धोका कमी करतो.

Spinach Juice Benefits | वजन कमी करण्यापासून ते प्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत, उन्हाळ्याच्या दिवसांत पालकाचा रस ठरेल फायदेशीर!
पालकाचा रस
Follow us
| Updated on: May 01, 2021 | 9:31 AM

मुंबई : उन्हाळ्यात पालकाचा रस सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. त्यात अनेक पौष्टिक घटक असतात. पालकाच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, खनिज, प्रथिने, व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सी सारखे अनेक पोषक द्रव्य असतात. पालकाचा रस संक्रमणाचा धोका कमी करतो. चला तर,पालकाचा रस पिण्याचे काही महत्त्वपूर्ण फायदे जाणून घेऊया…(Health benefits of Spinach juice it will help to reduce weight and boost immunity)

‘हे’ फायदे नक्की जाणून घ्या…

वजन कमी करण्यासाठी : पालकाचा रस वजन कमी करण्यास मदत करतो. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात पालकाचा रस समाविष्ट करू शकता. त्यात कॅलरी घातक कमी आणि फायबर गुणधर्म जास्त असतात. हे पेय वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी : पालकाच्या रसात मॅग्नेशियम असते. हे आपले शरीर उत्साही ठेवते. पालकाचा रस सेवन केल्यास आपली प्रतिकारशक्ती मजबूत राहते.

दृष्टी सुधारण्यासाठी : पालकाचा रस प्यायल्याने दृष्टी सुधारते. पालकामध्ये व्हिटामिन-ए आणि व्हिटामिन-सी असते. जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. हे डोळ्यांमध्ये होणार्‍या मॅक्युलर डीजनेशनच्या समस्येस प्रतिबंध करते.

पाचक प्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी : पालकांचा रस प्यायल्याने पोट निरोगी राहते. पालकांचा रस शरीरातून टॉक्सिक घटक बाहेर टाकतो. पालकाचा रस सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते (Health benefits of Spinach juice it will help to reduce weight and boost immunity).

हाडे मजबूत करण्यासाठी : पालकात कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हे घटक हाडे मजबूत करण्यात मदत करतात. यामुळे हाडे कमकुवत होण्यापासून प्रतिबंध केला जातो.

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी : पालकांच्या रसात अँटीऑक्सिडेंट असतात. ते त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यात मदत करतात. यामुळे आपला चेहरा चमकदार होतो.

लोहाच्या कमतरतेसाठी : पालकाचा रस शरीरात लोहाची कमतरता दूर करण्यात मदत करतो. बर्‍याचदा गर्भवती महिलांना पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी : पालकात व्हिटामिन सी आणि बीटा कॅरोटीन सारखे पोषक घटक असतात. याशिवाय यात पोटॅशियम आणि फोलेट असते, जे हृदय निरोगी ठेवतात. त्यात उपस्थित अँटीऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉलचे हानिकारक ऑक्सिडेशन रोखण्यास मदत करतात.

कर्करोगासाठी : पालकाच्या रसाचे सेवन केल्यास अनेक प्रकारच्या कर्करोगाशी लढायला मदत होते. त्यात फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ते कर्करोगाचा धोका कमी करण्यात मदत करतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health benefits of Spinach juice it will help to reduce weight and boost immunity)

हेही वाचा :

Summer Drink : मनाला ताजेतवाने करण्यासह त्वरित उर्जा देईल मँगो लस्सी, आपणही करा ट्राय

Health Tips : सर्दी खोकल्यावर गुणकारी हा स्पेशल देशी चहा, रोगप्रतिकार शक्ती वाढेल

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.