Health Tips : सर्दी खोकल्यावर गुणकारी हा स्पेशल देशी चहा, रोगप्रतिकार शक्ती वाढेल

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

| Edited By: |

Updated on: Apr 30, 2021 | 7:36 AM

मध आणि दालचिनी दोन्हीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मधात अँटीऑक्सिडेंट्स आणि एंजाइम असतात. याव्यतिरिक्त, त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म देखील असतात, जो संसर्गाविरूद्ध लढायला मदत करतो. (This special tea is good for cough and cold, will boost the immune system)

Health Tips : सर्दी खोकल्यावर गुणकारी हा स्पेशल देशी चहा, रोगप्रतिकार शक्ती वाढेल
काढा
Follow us

नवी दिल्ली : कोरोना साथीने देशभरात एक भयानक रूप धारण केले आहे. दररोज मोठ्या संख्येने लोक संक्रमित होत आहेत. अशा परिस्थितीत, सर्व लोक या विषाणूची लागण होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी तीव्र प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे. लोक यासाठी विविध उपाययोजना करीत आहेत. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशी एक घरगुती रेसिपी घेऊन आलो आहोत, जी तुमची रोगप्रतिकार शक्तीच मजबूत करणार नाही तर सर्दी आणि फ्लूसारख्या इतर आजारांशीही लढायला मदत करेल. (This special tea is good for cough and cold, will boost the immune system)

मध + दालचिनी आहे बहुगुणी

मध आणि दालचिनीपासून बनवलेल्या हर्बल चहाचे अनेक फायदे आहोत. मध आणि दालचिनी दोन्हीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मधात अँटीऑक्सिडेंट्स आणि एंजाइम असतात. याव्यतिरिक्त, त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म देखील असतात, जो संसर्गाविरूद्ध लढायला मदत करतो. दालचिनीमध्ये तत्सम उपचार करण्याचे गुणधर्म देखील आहेत, जे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत.

कसा बनवायचा स्पेशल चहा?

मध-दालचिनी चहा बनवण्यासाठी प्रथम पॅनमध्ये पाणी उकळवा. आता त्यात दालचिनीची पूड घाला. आता या पाण्याला 2-3 मिनिटे उकळी येऊ द्या. गॅसवरुन भांडे उतरल्यानंतर ते पाणी कपमध्ये घ्या. त्यात मध घाला आणि चहासारखे प्या. दालचिनी शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते. दालचिनी आणि मधाचा चहा प्यायल्याने अतिरिक्त चरबीही हळूहळू कमी होते. आर्थराईटिसची वेदनाही कमी करण्यास दालचिनी फायदेशीर आहे.

हे फायदे होतील

1. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. 2. शरीराला संसर्गापासून वाचविण्यात मदत करते. 3. हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी करते. 4. शरीराची जखम किंवा घाव भरून येण्यास मदत होते. 5. संधिवातामध्ये आराम मिळतो. 6. मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. 7. बर्‍याच प्रकारच्या अॅलर्जी बरे करण्यात प्रभावी. (This special tea is good for cough and cold, will boost the immune system)

इतर बातम्या

आता इतर राज्यांमध्ये गाडी घेऊन गेल्यास री-रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही, सरकारचा नवा प्रस्ताव

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; सेबीने नियम बदलले

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI