‘या’ व्हिटॅमिनमुळे तुमच्या चेहऱ्याची सुंदरता टिकून राहाते….
healthy skin tips: त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 आणि डी आवश्यक आहेत. त्यांच्या कमतरतेमुळे त्वचा काळी आणि निर्जीव होऊ शकते. अंडी, दूध, मशरूम इत्यादी खा आणि 15-20 मिनिटे उन्हात घालवा.

चेहऱ्यावरील सुंदरता टिकून ठेवण्यासाठी आजकल महिला पार्लरमध्ये हजारो रूपये घालवतात. परंतु मार्केट मध्ये मिळणाऱ्या क्रिम्समध्ये भरपूर प्रमाणात रसायनिक पदार्थांचा वापर होतो. आपल्या सर्वांनाच आपली त्वचा निरोगी, चमकदार आणि अगदी टोनड हवी असते. परंतु बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की त्वचेचा रंग हळूहळू काळवंडू लागतो, चेहरा निस्तेज दिसू लागतो आणि नैसर्गिक चमक नाहीशी होते. यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की ताणतणाव, जास्त वेळ उन्हात राहणे, झोपेचा अभाव किंवा हार्मोनल असंतुलन. पण सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे व्हिटॅमिनची कमतरता, विशेषतः व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डीची कमतरता.
क्रिम्समधील रसायनिक पदार्थांच्या वापरामुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे घरातील काही पदार्थांचा वापर केल्यामुळे तुमची त्वाचा चमकदार आणि निरोगी राहाण्यास मदत होते. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, शरीरात लाल रक्तपेशींची निर्मिती, डीएनए उत्पादन आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. पण जेव्हा त्याची कमतरता असते तेव्हा त्याचा त्वचेवर होणारा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. यामुळे त्वचेचा रंग असमान होतो. व्हिटॅमिन डी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमितपणे सूर्यप्रकाश घ्या आणि व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ आहारात समाविष्ट करा.
चेहऱ्यावर पिग्मेंटेशन आणि काळे डाग दिसू लागतात आणि त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे मेलेनिनचे असंतुलन होऊ शकते, ज्यामुळे त्वचा काळी दिसते, विशेषतः डोळ्यांखाली आणि तोंडाभोवती. व्हिटॅमिन डी सूर्यप्रकाशापासून मिळते, परंतु जर तुम्ही सूर्यप्रकाशापासून दूर राहिलात किंवा घरात जास्त वेळ घालवला तर त्याची कमतरता उद्भवू शकते. त्वचेच्या पेशींच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे त्वचा निर्जीव, कोरडी आणि काळी होऊ शकते. जर तुम्हाला तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवायची असेल, तर व्हिटॅमिन बी 12 साठी तुमच्या आहारात अंडी, दूध, दही, चीज, चिकन, मासे, फोर्टिफाइड तृणधान्ये समाविष्ट करा. व्हिटॅमिन डीसाठी, तुमच्या आहारात मशरूम, अंड्याचा पिवळा भाग, फोर्टिफाइड दूध आणि तृणधान्ये, सॅल्मन, ट्यूना सारखे फॅटी मासे समाविष्ट करा. तसेच, दिवसातून किमान 15-20 मिनिटे सौम्य सूर्यप्रकाश घ्या. याशिवाय, भरपूर पाणी प्या जेणेकरून त्वचा हायड्रेट राहील आणि जंक फूड आणि साखरेपासून दूर राहा. 7-8 तास झोप नक्की घ्या. याशिवाय, व्हिटॅमिन सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील महत्त्वाचे आहे. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की व्हिटॅमिन डी हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका कमी करू शकते. काही पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी असते, जसे की दुग्धजन्य पदार्थ, मासे आणि अंडे. सूर्यप्रकाशाने त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी तयार होते.
व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत. हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण वाढवते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. तसेच, ते रोगप्रतिकार शक्ती वाढवते आणि काही आजारांचा धोका कमी करते. व्हिटॅमिन डी कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण वाढवते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात. व्हिटॅमिन डी रोगप्रतिकार शक्ती वाढवते, ज्यामुळे आपल्याला विविध आजारांपासून संरक्षण मिळते. व्हिटॅमिन डी स्नायूंच्या कार्यक्षमतेत सुधारणा करते, ज्यामुळे ते मजबूत होतात. व्हिटॅमिन डीची कमतरता नैराश्य आणि चिंता वाढवू शकते. व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात घेतल्यास नैराश्य कमी होते.
