AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diet Plan | मधुमेहाच्या रुग्णांसाठी कसा असावा आहार? जाणून घ्या या डाएट प्लॅनविषयी…

मधुमेह हा बदलत्या जीवनशैलीमुळे जडलेला आजार आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांमध्ये तो वेगाने पसरत आहे.

Diet Plan | मधुमेहाच्या रुग्णांसाठी कसा असावा आहार? जाणून घ्या या डाएट प्लॅनविषयी...
| Updated on: Jan 19, 2021 | 10:35 AM
Share

मुंबई : मधुमेह हा बदलत्या जीवनशैलीमुळे जडलेला आजार आहे. सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांमध्ये तो वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार 2030पर्यंत भारतातील 9 कोटीहून अधिक लोकांना मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. मधुमेह हा हृदयरोग आणि मूत्रपिंडाच्या आजारांसाठीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. या आजारावर कोणताही इलाज नाही, परंतु जीवनशैलीत काहीसा सकारात्मक बदल करून हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेहाच्या रुग्णांचा डाएट प्लॅन काय असावा हे जाणून घेऊया…(Healthy Diet Plan for Diabetes patients)

मधुमेहग्रस्त रुग्णांनी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाव्या :

– मधुमेह रूग्णांना जास्त काळ उपाशी राहू नये. म्हणूनच, तज्ज्ञांनी त्यांना थोड्या थोड्या वेळाने खाण्याची शिफारस केली आहे.

– सकाळी दोन ग्लास पाण्याने दिवसाची सुरुवात करावी. ही पाणी हळूहळू प्यावे आणि शक्य असल्यास कोमट पाणी प्यावे.

– सकाळी ग्रीन टी किंवा लेमन टीचे सेवन करा. त्यात साखरेऐवजी गोडीसाठी मध वापरा. न्याहारीसाठी आपण अंडी, उपमा, मोड आलेली कडधान्ये किंवा पोहे खाऊ शकता.

– दर दोन तासांनी सफरचंद किंवा संत्र्यासारखी फळं खा.

– दुपारी 12 वाजताच्या दरम्यान लंच करावा. दुपारच्या आहारात दोन चपात्या, डाळ, भाज्या, दही इत्यादी पदार्थ खा. गहू, बार्ली आणि बेसन पीठ मिक्स करून त्याची चपाती बनवा (Healthy Diet Plan for Diabetes patients).

– संध्याकाळी चारच्या सुमारास हलका नाश्ता घ्या. यामध्ये नट्स, मखाना, उपमा, कोशिंबीरी, सलाड, सँडविच इत्यादींचा समावेश करू शकता.

– डिनर अर्थात रात्रीच्या जेवणामध्ये कोणतीही हंगामी भाजी आणि एक किंवा दोन चपात्या खा. रात्री चपातींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करा, त्याऐवजी अधिक भाज्या खा. चपाती ऐवजी आपण ओट्स, दलिया सारख्या फायबर-समृद्ध गोष्टी आहारात घेतल्यास हे आरोग्यासाठी उत्तम ठरेल.

– रात्री झोपण्यापूर्वी एक कप मलई नसलेले दूध प्या.

या गोष्टी लक्षात ठेवा :

मधुमेह रूग्णांनी रात्री 8 ते 9 दरम्यान रात्रीचे जेवण केले पाहिजे. कारण त्यांची पाचक प्रणाली सामान्य लोकांपेक्षा कमकुवत होते, ज्यामुळे जेवण उशीराने पचन होते. विलंब झालेल्या रात्रीच्या जेवणामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. जर आपल्याला रात्री भूक लागली असेल, तर आपण कुरमुरे, भाजलेले हरभरे इत्यादी खाऊ शकता. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांनीही त्यांच्या तंदुरुस्तीची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी योग आणि व्यायाम नियमित केले पाहिजेत. तसेच, सकाळी आणि संध्याकाळी कमीतकमी अर्धा तास चालणे आवश्यक आहे. तसेच, डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे वेळेत घेतली पाहिजेत.

(टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(Healthy Diet Plan for Diabetes patients)

हेही वाचा :

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.