AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heart Attack Signs: कधीच अचानक हार्ट अटॅक येत नाही, महिनाभर आधी जाणवतात ‘ही’ लक्षणे

आजकाल हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. पण हा हार्ट अटॅक कधीच अचानक येत नाही. त्याची लक्षणे महिनाभर आधी जाणवू लागतात. पण आपण बऱ्यचादा त्याकडे दुर्लक्ष करतो.

Heart Attack Signs: कधीच अचानक हार्ट अटॅक येत नाही, महिनाभर आधी जाणवतात 'ही' लक्षणे
Heart AttackImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 26, 2025 | 2:02 PM
Share

चीझ, बर्गर, टिक्की-समोसा, नान, मैदा आदी पदार्थांपासून कायम दूर राहा. या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात हानिकारक चरबी असते, जी शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल वाढवते. नंतर ही चरबी नसांमध्ये साठून हार्ट अटॅक येण्याचे मुख्य कारण ठरते. याच कारणामुळे आजकाल हार्ट अटॅकमुळे मृत्यूचे प्रमाण वाढत चालले आहे.

पण हार्ट अटॅक कसा येतो? तो अचानक येतो की मृत्यू येण्यापूर्वी काही संकेत देतो? हार्ट अटॅक कधीही अचानक येत नाही, तो येण्यापूर्वी अनेक महिने आधीच संकेत देण्यास सुरुवात करतो. पण बहुतेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, कारण त्यांना याबाबत माहिती नसते.

हार्ट अटॅकची 5 लक्षणे

जर तुम्हाला स्वतःत ही 5 लक्षणे जाणवत असतील, तर डॉक्टरांकडे जाण्यास विलंब करू नका. वेळीच उपचार मिळणे आणि जीवनशैलीत बदल करणे यामुळे या प्राणघातक स्थितीपासून वाचता येऊ शकते. वाचा: शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कसे कळते? त्वचेवरील ही लक्षणे देतील इशारा

१. चक्कर येणे किंवा अंधार दिसणे

बसून उठताना किंवा पुढे वाकताना चक्कर येणे किंवा अंधार दिसणे हे धोकादायक असू शकते. कारण हृदय कमकुवत झाल्यामुळे रक्तप्रवाह कमजोर होतो. यामुळे सर्व अवयवांमध्ये, विशेषतः मेंदूत ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. हे हार्ट अटॅकचे संकेत आहेत.

२. पाय सुजणे

पायांमध्ये सूज दिसणे हे हृदय कमकुवत होण्याचे संकेत असू शकते. शरीरातील जास्त फ्लूइड बाहेर पडत नाही, त्यामुळे ते गुरुत्वाकर्षणामुळे पायांमध्ये किंवा टाचांमध्ये साठू लागते. हे हृदयविकाराचे मोठे लक्षण असू शकते.

३. सतत थकवा

सतत जास्त थकवा जाणवणे हे हृदय कमकुवत असण्याचे लक्षण असते. हृदयाचे काम संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवणे असते. पण जेव्हा हृदय रक्त पंप करू शकत नाही, तेव्हा स्नायूंमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि ताकद कमी होऊ लागते.

४. श्वास घेण्यास अडचण

हार्ट अटॅकचे हे लक्षण सर्वाधिक महत्त्वाचे आहे. चालताना किंवा पायऱ्या चढताना श्वास घेण्यास अडचण येणे, घाबरणे किंवा बेचैनी होणे आणि बसल्यानंतर आराम मिळणे हे एक्झर्शनल डिस्प्नीया म्हणून ओळखले जाते. जेव्हा हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होते, तेव्हा फुफ्फुसांमध्ये रक्त साठू लागते आणि ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते.

५. छातीमध्ये जडपणा

छातीमध्ये सतत जडपणा जाणवणे हे अँजाइना म्हणजेच हृदयविकाराचे लक्षण असू शकते. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा असे दुखणे छातीपासून गळा, जबडा आणि हातांपर्यंत पसरू शकते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.