Honeymoon : लग्नाच्या पहिल्या रात्री दूध का पितात? ही निव्वळ प्रथा की त्यामागे दडलंय विज्ञान?
saffron milk on honeymoon : मधुचंद्राला अहोंना, केशरयुक्त अथवा हळदीचे दूध का देतात? हे कोडं ते दूध पिणाऱ्यांना पण कधी उलगडलेलं नाही. प्रथा म्हणून अनेकजण ते पितात, पण त्यामागे काही विज्ञान आहे का?

‘उंचावरून उताराकडे धावत येण्यात, हिवाळ्याची थंडी आणि लग्नाच्या पहिल्या रात्री जागण्यात एक वेगळीच मज्जा असते.’असं कोण्या लेखकानं म्हटलंय. लग्नाच्या पहिल्या रात्रीचं एक खास वैशिष्ट्ये आहे. ही रात्र दोन जीवांनाच नाही तर दोन आत्म्यांना जोडणारी दुवा असते. या रात्री नववधू लाजत एक ग्लास दुधाचा घेऊन येते. ही परंपरा कित्येक शतकं जुनी आहे. केशरयुक्त म्हणा अथवा हळदीचे म्हणा दूध ती जोडीदारासाठी घेऊन येते. अनेक चित्रपटात हा नाजूक प्रसंगी अनेकजण डोळ्यात प्राण आणून पाहतात. अनेकांच्या आयुष्यात हा प्रसंग येऊन गेलेला आहे. पण पहिल्या रात्री दूध पिण्यात काय लॉजिक आहे याकडे त्यांचं कधी लक्षच नसतं. त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का?
सोशल मीडियावर विविध उत्तरे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Quora वर अनेकांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. नववधू लग्नाच्या पहिल्या रात्री नवरदेवाला, वराला कोमट, गरम दुधाचा ग्लास का देतात, किंवा दूध प्यायला का देतात? असा प्रश्न विचारल्या गेला. त्यावर लोकांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींचं म्हणणं पडलं की पूर्वी तर स्त्री-पुरुष रात्री झोपण्यापूर्वी धारोष्ण दूध प्यायचे. यात काही नवीन नाही. तर दुसऱ्या एका व्यक्तीने ही एक प्रथा झाली आहे. त्यामागे काही विशेष नाही असं म्हटलं आहे. काहींच्या मते पती-पत्नीमध्ये पहिल्या रात्री ही औपचारिक बोलण्यासाठी, बोलण्याची सुरुवात होण्यासाठीची एक ट्रिक आहे. दुसरं काही नाही. दूध पिल्याने पुरुषांना शरीर संबंधावेळी थोडी शक्ती मिळते हा पण काहींचा मुद्दा होता.
या प्रथेमागील विज्ञान काय?
दूध हे तर पौष्टिक मानण्यात येते. त्यात गोडवा आणण्यासाठी मधाचा, गुळाचा अथवा साखरेचा प्रयोग होतो. त्यामुळे पिणाऱ्याच्या जीभेला चव येते. त्याचा मूड चांगला राहतो. मनावरील ताण कमी होतो. दोघेही नवीन असल्याने पहिल्या रात्री वैवाहिक जीवनाची सुरूवात करताना एक ताण असतो, तो दूर होण्यास ही प्रथा मदत करते. तर हे दूध आणि इतर घटक थकवा दूर करतात.
केशर लैंगिक इच्छा वाढवणारे मानण्यात येते. तर दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल असते, ते शरीराच्या वाढीसाठी, प्रथिनांसाठी योग्य मानते. मानसिक आरोग्य सुधारते. पहिल्या रात्री पुरुषांच्या मनावर जे दडपण येते ते या प्रथेमुळे कमी होते. दोघांना एकमेकांना समजून घेता येते. दूध प्यायल्यानंतर थकवा दूर होतो. त्यातील प्रथिनांच्या मदतीने टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हे दोघेही लैंगिक शक्तीवर्धक आहे. हळद, बडीशेप,काळी मिरी मिसळल्याने दुधाचे गुणधर्म वाढतात. त्यामुळे मूड तर सुधारतोच पण लैंगिक शक्ती वाढते.
डिस्क्लेमर : ही सर्वसामान्य माहिती, टीव्ही 9 दुजोरा देत नाही.
