AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hostel vs PG: पहिल्यांदाच घराबाहेर पडणाऱ्या मुलांसाठी Hostel चांगलं की PG? जाणून घ्या सविस्तर तुलना

एज्युकेशनसाठी आपल्या मुलाला पहिल्यांदाच घराबाहेर पाठवण्याचा निर्णय कुठल्याही पालकासाठी भावनिक आणि विचारपूर्वक असतो. अशा वेळी सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हॉस्टेलमध्ये ठेवावं की PG मध्ये? चला तर मग, या दोन पर्यायांमधील सविस्तर तुलना करून पाहूया आणि जाणून घेऊया तुमच्या मुलासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता ठरू शकतो.

Hostel vs PG: पहिल्यांदाच घराबाहेर पडणाऱ्या मुलांसाठी Hostel चांगलं की PG? जाणून घ्या सविस्तर तुलना
Hostel vs PGImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 2:18 AM
Share

कॉलेजमध्ये प्रवेशाच्या प्रक्रियेसोबतच पालक आणि विद्यार्थ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो की मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवावं की PG (पेइंग गेस्ट) मध्ये? दोघांमध्ये अनेक मूलभूत फरक असून, निर्णय घेताना विद्यार्थीचं वय, सवय, स्वावलंबन आणि सुरक्षेचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. चला तर पाहूया हॉस्टेल आणि PG यामध्ये नक्की काय फरक आहे, कोणते फायदे-तोटे आहेत आणि पालकांनी काय काळजी घ्यायला हवी.

हॉस्टेल म्हणजे काय?

हॉस्टेल म्हणजे शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली निवास सुविधा. यामध्ये नियम-कायदे कठोर असतात यामध्ये येण्याजाण्याचा वेळ, जेवणाचं वेळापत्रक, बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश अशा गोष्टी ठरलेल्या असतात. हॉस्टेल बहुधा कॉलेजच्या आवारातच किंवा जवळ असतो, त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो. हॉस्टेलमध्ये फीमध्ये भोजन, वीज, इंटरनेट, पाणी या सुविधा समाविष्ट असतात. विद्यार्थ्यांना एकत्र राहून मैत्री, सहकार्य आणि सामाजिक कौशल्य विकसित होतात.

PG म्हणजे काय?

PG हा “Paying Guest” (पेइंग गेस्ट) या शब्दाचा संक्षिप्त रूप आहे. PG ही अशी व्यवस्था असते जिथे विद्यार्थी किंवा नोकरी करणारे लोक दुसऱ्याच्या घरी किंवा खासगी इमारतीत भाड्याने राहतात आणि त्यासाठी ते दरमहा ठराविक रक्कम (भाडं) देतात. यामध्ये राहण्याच्या जागेसोबत जेवण, वाय-फाय, वीज, पाणी अशा काही सुविधा दिल्या जातात. काही वेळा त्या भाड्याच्या रकमेचा भाग असतात, तर काही वेळा वेगळ्या घेतल्या जातात.

हॉस्टेलचे फायदे:

हॉस्टेलमध्ये 24 तास वॉर्डन, सिक्युरिटी गार्ड आणि CCTV असतं, त्यामुळे पालकांचीही चिंता कमी होते. तसंच भोजन, पाणी, वीज आणि इंटरनेट या सगळ्या सुविधा एका ठराविक फीमध्ये मिळतात. हॉस्टेल कॉलेजच्या अगदी जवळ असतं, त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्चही वाचतो आणि एकाच वयाचे मुलं मुली सोबत असल्यामुळे मैत्री, सहकार्य आणि सामाजिक कौशल्यं देखील वाढतात.

हॉस्टेलचे तोटे:

हॉस्टेलमध्ये काही वेळा खूप कडक नियम असतात. ठराविक वेळेतच हॉस्टेलमध्ये यावं लागतं, बाहेरच्यांना आत यायची परवानगी नसते. त्यामुळे थोडा मोकळेपणा कमी वाटतो. तसंच बहुतांश वेळा खोली शेअर करावी लागते, त्यामुळे गोपनीयता कमी होते. जेवण ठराविक मेन्यूवरच असतं, त्यामुळे चव किंवा वैविध्य कमी वाटू शकतं. काही हॉस्टेल्समध्ये खोल्याही लहान असतात आणि AC किंवा खासगी बाथरूमसारख्या सुविधा नसतात.

PG चे फायदे:

PG म्हणजे पेइंग गेस्ट. येथे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार खोली निवडता येते आणि नियमदेखील थोडे कमी असतात, त्यामुळे वेळेचे जास्त बंधन नसतात. अनेक PG मध्ये AC, वाय-फाय, गरम पाणी, जेवण अशा सगळ्या सुविधा आपल्या बजेटनुसार निवडता येतात. याशिवाय PG वेगवेगळ्या लोकेशनवर उपलब्ध असतात, त्यामुळे तुम्हाला कॉलेजजवळ किंवा बाजाराजवळ राहता येतं.

PG चे तोटे:

PG खासगी व्यक्ती चालवतात, त्यामुळे ती सुरक्षीत असतीलच अशी नाही, तुम्हाला पाण्याचं, विजेचं, इंटरनेटचं आणि जेवणाचं वेगळं भाडं द्यावं लागू शकतं, त्यामुळे खर्च वाढतो. अनेक वेळा PG कॉलेजपासून लांब असतो, त्यामुळे प्रवासासाठी वेळ आणि पैसे लागतात. काही वेळा मालक खूप नियम लावतात किंवा गरजेच्या सुविधा योग्य पद्धतीने देत नाहीत. त्यामुळे PG निवडताना काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे.

पालकांसाठी टिप्स

  1. 1. प्रथमच बाहेर जाणाऱ्या मुलांसाठी हॉस्टेल योग्य पर्याय ठरू शकतो, कारण त्यात निगराणी, नियमित दिनचर्या आणि सामाजिक वातावरण लाभतं.
  2. 2. स्वावलंबी व मोकळेपणाची आवड असणाऱ्या मुलांसाठी PG देखील चांगला पर्याय असू शकतो, पण त्यासाठी काही गोष्टी तपासून पाहणं आवश्यक आहे:
  3. • घरमालकाची पार्श्वभूमी, सुरक्षा व्यवस्था, कॉलेजपासून अंतर
  4. • सर्व अटी आधीच स्पष्ट करून घ्या
  5. • वरिष्ठांकडून किंवा स्थानिक ओळखीच्या व्यक्तीकडून माहिती घ्या
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.