AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2025: भारतातच नाही तर ‘या’ देशांमध्येही मोठ्या थाटामाटात धुळवड होते साजरी

यावर्षी धुळवड म्हणजेच रंगपंचमी 14 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे. भारतातील अनेक भागांमध्ये धुळवड मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की केवळ भारतातच नाही तर जगभरात असे अनेक देश आहेत जिथे होळी साजरी केली जाते. चला तर या देशांबद्दल जाणुन घेऊयात...

Holi 2025: भारतातच नाही तर 'या' देशांमध्येही मोठ्या थाटामाटात धुळवड होते साजरी
'या' देशांमध्येही मोठ्या थाटामाटात धुळवड होते साजरी Image Credit source: TV9 bharatvasrh
| Edited By: | Updated on: Mar 13, 2025 | 7:30 AM
Share

रंगपंचमीचा सण साजरा करण्यासाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत. त्यामुळे रंगपंचमीचे नाव ऐकताच रंगीबेरंगी रंग, मजा आणि मस्ती, पदार्थांचा सुगंध आणि एक मजेशीर वातावरण आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. हा सण केवळ रंगांचे प्रतीक नाही तर परस्पर प्रेम, बंधुता आणि नवीन चांगल्या गोष्टीची सुरुवात यांचे प्रतीक आहे. भारतात रंगपंचमी मोठ्या उत्साहाने आणि आंनदाने साजरी केली जाते आणि जगातील अनेक देशांमध्येही त्याची क्रेझ दिसून येते. भारतात हा सण विशेषतः उत्तर भारत, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि बंगालमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

पण तुम्हाला माहिती आहे का की केवळ भारतातच नाही तर इतर अनेक देशांमध्येही रंगपंचमी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते? परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाने हा उत्सव त्यांच्या संस्कृतीशी जोडला आहे आणि तेथील स्थानिक लोकंही रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. चला तर मग जाणून घेऊया की भारताव्यतिरिक्त इतर कोणत्या देशांमध्ये रंगपंचमी हा सण साजरा केला जातो…

नेपाळ

नेपाळ हा भारताच्या शेजारील देश असण्यासोबतच, हिंदू संस्कृतीशीही खोलवर जोडलेले आहे. येथे रंगपंचमीला फागु पौर्णिमा म्हणून ओळखले जाते आणि ती देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. काठमांडू आणि पोखरा सारख्या मोठ्या शहरांमध्ये, रंगपंचमीच्या दिवशी तेथील रस्ते हे रंग, संगीत आणि नृत्याने भरलेले असतात. तसेच त्यांच्या देशामध्ये सुद्धा लोकं एकमेकांना रंग, पाण्याचे फुगे आणि गुलाल उधळून रंगवतात.

मॉरिशस

मॉरिशसमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय समुदाय राहत असल्याने या देशामध्ये सुद्धा रंगपंचमी मोठ्या उत्साहाने साजरी करतात. येथील रंगपंचमीचा उत्सव भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहारमधील रंगपंचमीसारखाच आहे. भजन-कीर्तन, होलिका दहन आणि रंगांशी खेळण्याची परंपरा देखील येथे पाहायला मिळते. मॉरिशस सरकार देखील या सणाला राष्ट्रीय सुट्टी देत, हा सण साजरा करणाऱ्याला मान्यता दिली आहे.

फिजी

फिजी हा असा देश आहे जिथे मोठ्या संख्येने भारतीय राहतात. असे मानले जाते की येथे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांची संख्या जास्त आहे. येथे रंगपंचमी पारंपारिकपणे संगीत आणि नृत्याने साजरी केली जाते. स्थानिक लोकं देखील या उत्सवात सामील होतात आणि बहुरंगी उत्सव म्हणून साजरा करतात.

पाकिस्तान

भारताच्या फाळणीनंतरही अनेक हिंदू पाकिस्तानमध्ये राहतात. विशेषतः सिंध प्रांत, कराची, लाहोर आणि इतर काही भागात. येथे राहणारे हिंदू कुटुंबे पूर्ण उत्साह आणि भक्तीने रंगपंचमी साजरी करतात. हिंदू मंदिरे आणि सामुदायिक केंद्रांमध्ये भव्य रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजित करतात. पाकिस्तानमध्येही लोकं एकमेकांना गुलाल आणि रंग लावून हा सण साजरा करतात.

बांगलादेश

बांगलादेशातही मोठ्या उत्साहात हिंदू रंगपंचमी साजरी करतात. ढाका, चितगाव आणि सिल्हेट सारख्या भागात विशेषतः रंगपंचमी सण साजरा होतो. तसेच येथे होळीला डोल पौर्णिमा किंवा वसंत उत्सव असेही म्हणतात. भारताप्रमाणेच, येथील हिंदू समुदायाचे लोक रंग आणि गुलाल उधळून रंगपंचमी खेळतात. मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि हवन आयोजित केले जातात.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.