AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात दिवसाला किती पाणी प्यावे? अन्यथा होऊ शकतात हे गंभीर आजार

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे जास्त तहान लागत नाही. त्यामुळे लोक अनेकदा कमी पाणी पितात. पाणी कमी प्यायल्याने तुमचे शरीर अनेक आजारांचे घर बनू शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक आजरांचा धोका असतो. त्यामुळे हिवाळ्यात दिवसभरात किती पाणी प्यायला हवे जाणून घ्या.

हिवाळ्यात दिवसाला किती पाणी प्यावे? अन्यथा होऊ शकतात हे गंभीर आजार
| Updated on: Dec 18, 2023 | 7:43 PM
Share

मुंबई : भारतात थंडी सुरु झाली आहे. हिवाळा सुरु झाला की अनेक आजारांचा धोका देखील वाढतो. हिवाळ्यात आहारात तसा बदल करणे देखील महत्त्वाचे असते. तसे केले नाही तर अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात थंड वातावरणामुळे जास्त तहान लागत नाही. त्यामुळं लोकं कमी पाणी पितात. पण कमी पाणी प्यायल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. कमी पाणी पित असाल तर त्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसू लागतात. शरीरात ७० टक्के पाणीच असते. जी शरिराला हायड्रेट ठेवते. त्यामुळे हिवाळ्यात किती पाणी प्यायला पाहिजे हे जाणून घेऊया.

डिहायड्रेशन होणे

हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने शरीर निर्जलित होते. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो.

युरिन इन्फेक्शन

कमी पाणी पिल्याने युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता ही वाढते. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने मूत्राशय आणि त्याच्या नळीला बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो. यामध्ये महिलांना अधिक धोका असतो.

तोंडाची दुर्गंधी

पाणी कमी प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. कमी पाणी प्यायल्याने आपले शरीर निर्जलीकरण होते, ज्याचा आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर वाईट परिणाम होतो.

पोटाशी संबंधित समस्या

कमी पाणी प्यायल्याने पोटाशी संबंधित आजार उद्भवतात. पचनक्रिया कमकुवत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

लघवीला दुर्गंधी

पाणी कमी पित असाल तर लघवीला पिवळी होते. शिवाय दुर्गंधी देखील येते. असं होत असेल तर समजा तुम्ही कमी पाणी पित आहात.

त्वचेचे विकार

कमी पाणी पिल्यामुळे त्वचा कोरडी पडते. याशिवाय इतर त्वचेचे आजार देखील होऊ शकतात. चेहऱ्यावर मुरुमांची समस्या वाढू शकते.

किडनीवर वाईट परिणाम

शरीरात पाण्याची कमतरता आली तर त्याचा सर्वात आधी ताण हा  किडनीवरच पडतो. जे चांगले लक्षण नाही.

एका दिवसात किती पाणी प्यावे

हिवाळ्यात स्वत:ला निरोगी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज 7-8 ग्लास पाणी प्यावे. दर तासाला मध्ये मध्ये पाणी प्यायला हवे. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटू शकते.

Follow Us
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात.
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले...
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले....
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न.
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार...
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार....
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना.
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने.
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?.
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच.