रामायण-महाभारतातही उल्लेख, धार्मिक पूजेतील मानाचे ‘पान’ कसे बनले ‘माऊथ फ्रेशनर’?

सुपारी आणि पानाची चव बर्‍याच काळापासून लोकांच्या जिभेवर आहे. पानच्या उत्पत्तीविषयी बर्‍याच कथा सांगितल्या जातात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 10:42 AM, 21 Jan 2021
रामायण-महाभारतातही उल्लेख, धार्मिक पूजेतील मानाचे ‘पान’ कसे बनले ‘माऊथ फ्रेशनर’?

मुंबई : ‘पान’ म्हणताच गुलकंदाचा गोडवा, लाल-लाल ओठ आणि एक छोटे दुकान, ज्यावर धोतर-कुर्ता घातलेला एक व्यक्ती मांडी घालून बसलेला, असे सगळे दृश्य डोळ्यासमोर तरळते. या पानांच्या दुकानावर उभ्या असणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच काहीना काही संवाद सुरु असतो. हा संवाद ऐकत पानवाला हसत-हसत पान लावत असतो. हे दृश्य उत्तर भारतातील जवळजवळ प्रत्येक लहान-मोठ्या बाजारात दिसते (How Paan Leaf becomes a mouth freshener know the interesting story).

सुपारी आणि पानाची चव बर्‍याच काळापासून लोकांच्या जिभेवर आहे. हिंदू धर्मात, सुपारी आणि पान खूप पवित्र मानले जाते आणि शतकानुशतके ते पूजाच्या साहित्यात वापरले जात आहे. मात्र, आता हे पवित्र पान, लोकांसाठी एक उत्तम ‘माऊथ फ्रेशनर’ बनले आहे. चला तर, पानाच्या या ‘बदला’मागची आणि त्याची इतिहासाशी संबंधित मनोरंजक माहिती जाणून घेऊया…

विड्याच्या पानासंबंधित पौराणिक मान्यता

पानच्या उत्पत्तीविषयी बर्‍याच कथा सांगितल्या जातात. अशी श्रद्धा आहे की, भगवान शिव आणि माता पार्वती यांनी हिमालयात विड्याच्या पानाची पहिली बी पेरली होती. म्हणूनच याचा उपयोग पूजेच्या साहित्यात ‘पवित्र पान’ म्हणून केला जातो. तर या मागची दुसरी मान्यता अशी आहे की, अमृत मंथनाच्या वेळी आयुर्वेदज्ञ धन्वंतरिंच्या कलशात जीवनदान देणाऱ्या औषधांसह विड्याच्या पानाची देखील उत्पत्ती झाली होती.

रामायण-महाभारतातही उल्लेख

रामायण आणि महाभारतातही ‘विड्याच्या पानांचा’ उल्लेख आहे. रामभक्त हनुमानजी जेव्हा अशोक वाटिका गाठतात आणि सीता मातेला भगवान रामाचा संदेश देतात, तेव्हा माता सीता खूप आनंदित होतात आणि त्यांना काहीतरी देऊ इच्छितात. अशा स्थितीत त्यांना तिथे केवळ ही पाने दिसतात. माता सीता त्या पानांची हार बनवून हनुमानाला अर्पण करतात. म्हणूनच असे मानले जाते की, हनुमानजींना विड्याची पाने आवडतात. त्याच वेळी, महाभारताच्या काळात पूजा करण्यासाठी विड्याच्या पानांचा आवश्यक सामग्री म्हणून उल्लेख केला गेला आहे. महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर अर्जुनाने आयोजित केलेल्या यज्ञासाठी पंडित पूजेत ही विड्याची पाने मागतात, असे लिहिले गेले आहे (How Paan Leaf becomes a mouth freshener know the interesting story).

मोगलांनी बनवले ‘माऊथ फ्रेशनर’

सनातन धर्मात पवित्र मानले जाणारे ‘विड्याचे पान’ जेव्हा मोगलांच्या हाती लागले, तेव्हा त्यांनी त्यावर चुना, लवंगा, वेलची इत्यादी टाकून हे पान ‘माऊथ फ्रेशनर’ म्हणून खाण्यास सुरुवात केली. मोगल बादशाह जेवणानंतर खास पाहुण्यांना खुश करण्यासाठी हे पान खायला घालत असत. हळूहळू मोगलांमध्ये त्याची लोकप्रियता वाढत गेली आणि मोठ्या प्रमाणात विड्याची पाने शाही दरबारात पाठवली गेली.

नूरजहांने कॉस्मेटिक म्हणून वापर केला

बर्‍याच काळासाठी केवळ पुरुष पानांचा स्वाद घेत होते. परंतु, काळाबरोबर त्याचा ट्रेंडही बदलला आणि मेकअपच्या वेळी ते ‘कॉस्मेटिक’ म्हणून वापरण्यास सुरुवात झाली. प्रथमच नूरजहांने ओठांवर लाली आणण्यासाठी म्हणून पानांचा वापर केला. यानंतर, बर्‍याच महिलांनी याचा वापर करण्यास सुरुवात केली.

ब्रिटिश काळातही ‘पाना’ची लोकप्रियता

इंग्रजी राजवटीच्या काळातही पानांची लोकप्रियता होती. त्याकाळात, हिंदू कुटुंबात विवाह सोहळ्यामध्ये मुलीच्यावतीने सोन्याच्या ताटात मुलाच्या घरी सुपारी-पान पाठवले जायचे. या थाळीतील पानांच्या संख्येवरून मुलीच्या स्थितीचा अंदाज लावला जात असे.

आजही लोक खातात पान

मुघलांचे हे ‘माऊथ फ्रेशन’ कालांतराने सगळ्यांमधेच लोकप्रिय झाले. आजही भारतातील लोक पानसाठी वेडे आहेत. उत्तर भारतात पान-सुपारी खाण्याची प्रथा अतिशय सामान्य आहे. कालांतराने पानांचेही बरेच प्रकार तयार होत गेले. आज बाजारात गुलकंद पान, चॉकलेट पान, साधे पान, बनारसी पान इत्यादी वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत आणि लोक आजही प्रचंड आवडीने हे पान खातात.

(How Paan Leaf becomes a mouth freshener know the interesting story)

हेही वाचा :