विमान क्रॅश होत आहे किंवा काही धोका जाणवला; प्रवाशांनी नक्की काय करावं? जेणेकरून वाचण्याची शक्यता
विमानातून प्रवास करताना काही धोका जाणवल्यास प्रवाशांनी कोणती काळजी घ्यावी याबाबतची माहिती या लेखात आहे. विमानाचा नक्की कोणता भाग अधिक सुरक्षित असल्याचे मानले जातं. तसेच नक्की कोणत्या गोष्टी तातडीने कराव्यात हे जाणून घेणं महत्त्वाचं.

अहमदाबादमधील मेघानीजवळ एअर इंडियाचं प्रवासी विमान टेकऑफवेळी कोसळल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 12 जून 2025 रोजी घडली आहे. कोसळलेल्या एअर इंडियाचं प्रवासी विमान टेकऑफवेळी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे विमान लंडनला जातं होतं आणि टेकऑफच्या वेळीच हे विमान कोसळल्याची माहिती आहे. अपघातवेळी विमानात 242 प्रवासी होते. जखमींना बाजूलाच असणाऱ्या सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी तातडीने दाखल करण्यात आलं आहे. विमान कोसळण्याची तशी बरीच कारणे आहेत. पण जेव्हा हे पायलटच्या लक्षात येत तेव्हा तो त्याची भूमिका चोख बजावतो प्रवाशांना अलर्ट करतो. तसेच विमानाच्या धोक्याचे सिग्नल देऊन मदतही मागतो. त्यामुळे बऱ्याचदा मोठी जीवितहानी होण्यापासून बचाव होतो. त्यामुळे विमान क्रश हे त्यावेळेच्या परिस्थितीवरच समज की ते किती भीषण असू शकतं.
पण विमान क्रॅश होत असल्यासच लक्षात येताच किंवा काही धोका होत असल्याचं लक्षात येताच प्रवाशांनी नेमकी कोणती काळजी घ्यायची असते. ते पाहुया.
विमान क्रॅश होत असल्यास, विमानात बसलेल्या प्रवाशांनी तातडीने सीटबेल्ट बांधावा आणि क्रॅशच्या वेळी ब्रेस पोझिशन घ्यावी. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्याची तयारी ठेवावी आणि क्रॅश लँडिंगच्या वेळी क्रू सदस्यांच्या सूचनांचे पालन करावे. विमान क्रॅश होत असल्यास, प्रवाशांनी खालील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत
1. सीटबेल्ट: तातडीने सीटबेल्ट बांधावा.
2. ब्रेस पोझिशन: आपत्कालीन परिस्थितीत, विमानात क्रॅश होत असल्यास डोके आणि मानेला दुखापत होण्याचा धोका कमी करण्यासाठी ब्रेस पोझिशन (डोके आणि मान खाली करून बसणे) घ्यावी.
3. आपत्कालीन मार्ग: आपल्या सीटच्या जवळच्या आपत्कालीन मार्गाची माहिती मिळवावी आणि तेथे कसे जायचे हे लक्षात ठेवावे.
4. क्री सदस्यांच्या सूचना: क्रू सदस्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.
5. शांत राहा: अशा परिस्थितीत भीती वाटणे सहाजिकच आहे. पण तरीही स्वत:ला शांत करण्याचा प्रयत्न करावा. घाबरू नये. कारण शांत राहणे आपत्कालीन परिस्थितीत मदत करू शकते.
6. बॅग आणि इतर वस्तू: प्रवासात असलेल्या बॅग आणि इतर वस्तूंवर लक्ष ठेवू नये
7. विमानाचा मागचा भाग: सांख्यिकीयदृष्ट्या, विमानाचा मागचा भाग अधिक सुरक्षित मानला जातो, त्यामुळे तेथील सीट निवडल्यास चांगले.
8. सीट निवडा: आपत्कालीन दरावाजा मार्गाजवळची सीट निवडल्यास, आपत्कालीन परिस्थितीत लवकर बाहेर पडणे शक्य होते.
9. प्रवासाला जाण्यापूर्वी: प्रवासाला जाण्यापूर्वी, विमानातील आपत्कालीन प्रक्रियेची माहिती घ्यावी.
डिस्क्लेमर: या टिप्समुळे आपत्कालीन परिस्थिती टाळता येते किंवा हे 100% सुरक्षितच असतं असं म्हणता येणार नाही पण. नक्कीच यामुळे सतर्कता वाढून त्यामुळे सुरक्षितताही वाढू शकते. किंवा अशा परिस्थितीतून पटकन बाहेर पडणे शक्य होते. मदत मिळू शकते. पण पुन्हा एकदा अखेर सर्व अवलंबून त्या घटनेच्या तीव्रतेवरच असते.