मंगळसूत्राची निवड कशी करायची? सोप्या टिप्स जाणून घ्या
आज आम्ही तुम्हाला मंगळसूत्राची निवड कशी करायची? यासंदर्भात काही सोप्या आणि खास टिप्स सांगणार आहोत. तुम्ही स्वतःसाठी मंगळसूत्राची निवड करत असाल तर ते अगदी छान असायलाच हवे. यासाठी ही माहिती नक्की वाचा.

लग्न ठरलंय का? मंगळसूत्र कोणत्या डिझाईनचे घ्यावे, असा प्रश्न पडला असेल तर ही बातमी नक्की वाचा. तुम्ही नेहमीच्या वापरासाठी कसे मंगळसूत्र घालणार आहात अथवा तुम्हाला कशा पद्धतीचे आणि डिझाईन्सचे मंगळसूत्र हवे आहे, हे ठरवण्यासाठी काही सोप्या टिप्स पुढे दिल्या आहेत, त्या जाणून घ्या.
1. सर्वप्रथम तुमचे बजेट ठरवा
मंगळसूत्राची वेगवेगळी डिझाईन्स तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता. कोणतेही डिझाईन तुम्ही निवडण्यापूर्वी तुम्हाला नक्की किती किमतीपर्यंत मंगळसूत्र विकत घ्यायचे आहे, याबाबत बजेट तुम्ही ठरवा. रोज मंगळसूत्र वापरणार असाल किंवा नाही, हे देखील ठरवून घ्या. तुम्ही मंगळसूत्रासाठी किती किंमत मोजणार आहात, याचा विचार सर्वात आधी व्हायला हवा. बजेट ठरवल्यास, तुम्हाला पुढे दुकानात जाऊन अथवा सोनाराकडे जाऊन डिझाईन्स ठरवणे अधिक सोपे होते.
2. तुमच्या पद्धतीने मेटलची निवड करा
आता केवळ सोन्याचे मंगळसूत्रच तयार करायचे अशी पद्धत राहिलेली नाही. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने मेटलची निवड करू शकता. एका पद्धतीने पाहिले तर सोन्यासह आता प्लॅटिनम, हिऱ्याचे मंगळसूत्र, व्हाईट गोल्ड इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे मेटलची निवड करून मंगळसूत्र तयार करून घेता येते.
3. लांबी लक्षात घ्या
मोठी मंगळसूत्रे घालून स्वयंपाकघरात काम करणे शक्य नाही. काम करताना मंगळसूत्र लांब असेल तर नक्कीच त्रास होतो, अनेकदा साडी अथवा कपड्यांमध्ये मंगळसूत्र अडकून राहाते आणि कधी कधी ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या वापरासाठी तुम्ही तयार करून घेणारे मंगळसूत्र हे मध्यम स्वरूपाच्या लांबीचे अथवा अगदी गळ्याबरोबरील लांबीचे ठेवा. जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही.
4. पेंडंट डिझाइनही खास
तुम्ही जड मंगळसूत्रापासून ते अगदी हलक्या मंगळसूत्रापर्यंत निवड करू शकता. तुम्ही जे डिझाईन निवडणार असाल ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा. म्हाला अशा पद्धतीचे पेंडंट हवे असेल तर तुम्ही हलक्या वजनाचे पेंडंट निवडा. तुम्ही जर पार्टीसाठी एखादे मंगळसूत्र निडवणार असाल तर त्याचे पेंडंट थोड जड वजनाचे असू द्या.
5. मॅचिंगवर लक्ष द्या
मॅचिंग कानातले अथवा अन्य तुमच्याकडे असणाऱ्या दागिन्यांच्या डिझाईन्ससह याचे डिझाईन्स मॅच होत आहे की नाही, हे तपासा. एखादा मॅचिंग सेट असेल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो. त्यासाठी तुम्हाला नंतर वेगळी खरेदी करावी लागणार नाही.
6. हॉलमार्कचेचे दागिने खरेदी करा
कोणताही दागिना असो नेहमी लक्षात ठेवा की, हॉलमार्कचेच दागिने खरेदी करा. हॉलमार्कचे मंगळसूत्र हे खरे असून अधिक काळ टिकते.