AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Tips : कुकटॉपवर जळलेले डाग आणि पांढऱ्या रेषा? अशा पद्धतीने करा साफ; मॉडर्न कुकटॉपची अशी घ्या काळजी

ग्लास-सिरेमिक कुकटॉपवर पदार्थ सांडल्यानंतर तो वाळल्यास हट्टी डाग तयार होऊ शकतात. जोरात घासण्याऐवजी योग्य क्लिनिंग पद्धत वापरल्यास कुकटॉप स्वच्छ ठेवता येतो.

Kitchen Tips : कुकटॉपवर जळलेले डाग आणि पांढऱ्या रेषा? अशा पद्धतीने करा साफ; मॉडर्न कुकटॉपची अशी घ्या काळजी
cook top cleaningImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 02, 2026 | 7:55 PM
Share

ग्लास – सिरेमिक कुकटॉप किचनला मॉडर्न लुक देतो.पण स्वयंपाक करताना एखादा पदार्थ कुकटॉपवर सांडतो आणि आपण नंतर साफ करू अस म्हणतो पण आपला नंतर येईपर्यंत तो डाग चांगलाच कडक होतो आणि चिपकून जातो. मग सुरू होत घासाघासीचं काम. मात्र सिरामिक कुकटॉप साफ करताना जोर लावण्यापेक्षा योग्य पद्धत वापरणं महत्त्वाचं असतं.

साफ करण्याआधी कुकटॉप थंड होऊ द्या

रोजची साफसफाई करण्यापूर्वी कुकटॉप बंद करून त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यावे. त्यानंतरच साफसफाई सूरू करा. मात्र साखर,दूध असे पदार्थ पडले असतील तर त्यावर थोडे पाणी शिंपडून ठेवा. जेणेकरून ते डाग सुकणार नाहीत. असे डाग ओले राहिले तर लगेच साफ करता येतात.

डिशवॉशने स्वच्छ करा

रोजच्या सफाईसाठी कुकटॉप थंड झाल्यावर पाण्यात थोडं डिशवॉशिंग लिक्क्विड मिसळा. हे मिश्रण मऊ स्पंज किंवा स्वच्छ ओल्या कपड्याने कुकटॉपवर हलक्या हाताने पुसा. साफ केल्यानंतर कोरड्या आणि मऊ कपड्याने पुन्हा पुसाय यामुळे पाण्याचे डाग आणि ओलावा कमी होण्यास मदत होते.

जळलेले डाग जोरात घासू नका

कुकटॉपवर जळलेला पदार्थ चिकटला असेल तर स्टिलचा स्क्रबर किंवा खडबडीत वस्तूने घासू नका. त्यामुळे ग्लासवर ओरखडे पडू शकतात. त्याऐवजी ग्लास -सिरेमिक कुकटॉपसाठी योग्य क्लिनर वापरा.

चिकट पदार्थ काढण्यासाठी स्क्रॅपरची काळजी

साखर, सिरप, टोमॅटो किंवा वितळलेल्या प्लास्टिकचा पदार्थ कुकटॉपवर घट्ट चिकटला असेल तर च्या कुकटॉपच्या सूचनानुसार स्क्रॅपरचा वापर करावा. स्क्रॅपर साधारण ४५ अंशाच्या कोनात ठेवून अतिशय हलक्या हाताने वापरावा,

पांढऱ्या रेषा किंवा पाण्याचे डाग कसे काढाल?

कुकटॉपवरील पांढरे डाग काढण्यासाठी तुम्ही पांढऱ्या व्हिनेगरचा वापर करू शकता. त्यामुळे डाग स्वच्छ होतील आणि ग्लास एकदम चमकून जाईल.

कुकटॉपची ग्लास स्वच्छ कशी ठेवाल?

कुकटॉपवर भांडी ओढत नेऊ नका. ती उचलून ठेवा. भांड्याचा तळ स्वच्छ आणि कोरडा असू द्या. स्वयंपाक करताना वस्तू सांडल्यास वेळोवेळी पुसा. रोजची हलकी सफाई तुमचा कुकटॉप चमकून ठेवेल.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा