AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

How to clean Tawa : कळकट्ट तव्यामुळे वैतागलात ? या ट्रिकने 10 मिनिटांत लख्ख होईल तवा, Video व्हायरल

स्वयंपाकघरात सर्वाधिक आणि दररोज वापरला जाणारा तवा दिवसेंदिवस काळा होत जातो. कधीकधी भाकरी जाळताना किंवा पराठा बेक करताना त्यात घाण साचू लागते. तो घासून स्वच्छ करण्यात बराच वेळ जातो. मात्र काळा तवा 10 मिनिटांत लख्ख करण्यासाठी एक ट्रिक सांगण्यात आली आहे.

How to clean Tawa : कळकट्ट तव्यामुळे वैतागलात ? या ट्रिकने 10 मिनिटांत लख्ख होईल तवा, Video व्हायरल
कळकट्ट तवा साफ करण्याची सोपी ट्रिकImage Credit source: social media
| Updated on: Jul 07, 2025 | 1:43 PM
Share

स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंचा रोज वापर होत असतो, त्यातीलच एक म्हणजे आपला तवा. रोजच्या रोज पोळ्या, भाकरी केल्याने हा तवा हळूहळू काळा पडतो, करपल्यासारखा कळकट्ट दिसू लागतो. जरी तो आपण नियमित घासला तरी त्याचे काळेपणआ काही पटकन दूर होत नाही आणि असा कळकट्ट तवा वापरणं आपल्यालाही बरोबर वाचत नाही. हा काळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. स्वयंपाकघरात सर्वाधिक आणि दररोज वापरला जाणारा तवा दिवसेंदिवस काळा होत जातो. कधीकधी भाकरी जाळताना किंवा पराठा बेक करताना त्यात घाण साचू लागते. जर तो दररोज व्यवस्थित स्वच्छ केला नाही, तर असा दिवस येतो जेव्हा घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवणे कठीण होते आणि ते स्वच्छ करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते याचा विचार करून आपण मागे हटतो.

मात्र तव्याचा हाच काळेपणा दूर करण्यासाठी एक सोपी आणि हमखास सफल होईल अशी खात्रीशीर टीप सोशल मीडियावर शेअर करण्यात आली त्याचा एक व्हिडीओदेखील अपलोड करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका महिलेना हा व्हिडीओ टाकत सोपी युक्ति शेअर केली आहे.

तासनतास तवा घासण्यापेक्षा या महिलेने सांगितलेली ट्रिक वापरून कळकट्ट तवा काही मिनिटांतच साफ होऊ शकतो. अवघ्या 10 मिनिटांत हा तवा साफ कसा करायचा ते जाणून घेऊया.

तवा साफ करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू

1 टेबल स्पून डिटर्जंट पावडर, 1टेबल स्पून बेकिंग सोडा, 1 लिंबू, पाणी, घासणी

पहिली स्टेप

तुमचा काळा तवा स्वच्छ करण्यासाठी, सर्वप्रथम तो गॅसवर ठेवा आणि चांगला गरम होऊ द्या. तो इतका गरम वहायला पाहिजे, की तुम्ही त्यावर पाण्याचे काही थेंब टाकले तर लगेच वाफ व्हायला हवी. तवा तापल्यानंतर गॅसची आच पूर्णपणे कमी करा. आता त्यावर आधी पाणी, मग डिटर्जंट पावडर, नंतर बेकिंग सोडा घाला आणि लिंबाचे दोन तुकडे करून त्याचा रस पिळून घ्या. नंतर लिंबाची सालही त्यातच घाला.

दुसरी स्टेप

आता या मिश्रणात लिंबाचा रस मिसळला की, काळेपणा हळूहळू कमी होऊ लागेल. त्यानंतर तुम्हाला तवा 5 मिनिटे गॅसवर ठेवायचा आहे. पाणी उकळत राहू दे, त्यामुळे काळेपणा कमी होऊ लागेल. दरम्यान, लिंबाची साल काट्याने पकडा आणि त्याच्या सहाय्यानेच लिंबाची सालं तव्यावर घासत रहा.

गॅस करा बंद

काही वेळेनंतर, गॅस बंद करा आणि तो खाली उतरवून सिंकमध्ये टेवा. गरम पाण्याचे मिश्रण काढून टाका आणि स्टील स्क्रबरच्या मदतीने तवा घासून स्वच्छ करा. असे 5 मिनिटे स्क्रब केल्याने पॅनवरील काळेपणा पूर्णपणे निघून जाईल. आणि जास्त प्रयत्न न करता, काळा तवा 10 मिनिटांत स्वच्छ होऊन चमकू लागेल.

ही ट्रिक कशी ठरेल उपयोगी ?

खरं तर, बेकिंग सोड्याचे छोटे कण सौम्य माइल्ड एब्रेसिव म्हणून काम करतात; जेव्हा ते तव्यावर घासले जातात तेव्हा ते जमा झालेले काळेपणा, वंगण आणि जळलेले कण खरवडण्यास आणि सैल करण्यास मदत करतात. तर लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं, जे एक नैसर्गिक ॲसिड आहे. परंतु ते चरबी आणि तेल तोडण्यात देखील खूप प्रभावी आहे. गरम तव्यावर बेकिंग सोडा आणि डिटर्जंटसह एकत्र केल्यास ते आणखी प्रभावी होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, आमचा याला दुजोरा नाही. )

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....