AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफिस आणि घर सांभाळताना होतेय दमछाक…मग या टिप्स करा फॉलो आणि बना सुपर वुमन

आज महिला घरासोबत नोकरीही करत आहेत. कोणी ऑफिसमध्ये जातं तर कोणी स्व:तचा व्यवसाय करतेय. घरी आणि नोकरी एकत्र सांभाळणं इतकं सोप नाही. पण त्या अनेक आव्हानांना समोरे जात या दोन्ही गोष्टी सांभाळत आहे. या दोन्ही गोष्टी सांभाळताना तिची तारेवरची कसरत होते आहे. अनेक वेळा घरात मुलं व्यवस्थित आहे की नाही या चिंतेत तिचा ऑफिसच्या कामाकडे दुर्लक्ष होतं. आणि मग नोकरी करण्याची इच्छा असूनही आपल्याला न जमणार नाही म्हणून ती निराश होऊन जाते. मग आता आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुमची ही तारेवरची कसरत सोपी होईल.

ऑफिस आणि घर सांभाळताना होतेय दमछाक...मग या टिप्स करा फॉलो आणि बना सुपर वुमन
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 18, 2021 | 9:19 PM
Share

वर्किंग वुमन…आज अनेक महिला या वर्किंग वुमन झाल्या आहेत. त्या ऑफिससोबत घराची जबाबदारीही सांभाळत आहेत. पण या ऑफिसमध्ये असताना त्यांचं मन घरी असलेल्या आपल्या मुलाकडे असतं. तो जेवला का, तो काय करत असेल अशा असंख्य प्रश्नांनी त्यांचं मन ऑफिसमध्ये असून घरात असतं. मग अशावेळी ऑफिसमधील कामावर त्याचा परिणाम होतो. मग अशावेळी आम्ही आहोत ना तुम्हाला मदत करायला. आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यांनी तुम्हाला नक्की फायदा होईल.

घरातील कामाची विभागणी करा

घरात नवरा बायको आणि मुलं असं तुमचं त्रिकोण कुटुंब असेल. आणि जर आजीआजोबाही असतील तर मग तुमचं काम खूप सोपं होऊन जातं. घरातली कामांचं कुटुंबातील सगळ्यांमध्ये विभागणी करा. संसार हा सगळ्यांचा असतो. एकमेकांना साथ देत पुढे जायचं असतं. त्यामुळे काम करताना तुमचं ओझ काही प्रमाणात कमी होईल.

मुलांना घरी फोन करण्याची वेळ ठरवा

ऑफिसमध्ये असताना ऑफिसच्या कामाला महत्त्व द्या. नोकरी करणे हा तुमचा निर्णय असतो. त्यामुळे नोकरी करताना सारखा घरचा विचार करुन कामावर परिणाम करुन घेणे योग्य नाही. हा तुमच्या कामासोबत तुम्ही केलेला अन्याय असतो. म्हणून घरी मुलांना फोन करण्याच्या वेळा ठरवून घ्या. सतत घरी फोन करु नका. तर मुलांमध्ये असा विश्वास निर्माण करा की ते तुमच्या काम समजून घेऊन तुम्हाला सारखे फोन करणार नाही.

मल्टी टास्किंग हवा

महिलांना घर आणि नोकरी सांभाळायची असेल तर महिलांना मल्टी टास्किंग होणं गरजेचं आहे. एका वेळी कामाचं नियोजन करुन ती एकत्र करता आली पाहिजे. कुकर लावला असेल तर त्या वेळेमध्ये दुसरीकडे मशिनला कपडे लावणे, झाडांना पाणी टाकणे आदी काम करता आले पाहिजे. अगदी घरातली छोटी मोठी काम करताना आपल्या मुलाशी गप्पा मारा त्याचा खेळा. घर आणि नोकरी एकत्र करत कामय हसरा चेहरा ठेवणे ही गोष्ट काही सोपी नसते. ऑफिसचं टेन्शन असून घरात सगळ्यांकडे लक्ष देणे त्यांच्या आवडीनिवडी सांभाळणे यासाठी महिलांना खरंच सलाम आहे.

Friendship : मैत्रीसाठी काहीही..! पद्मिनीनं पळून जाऊन लग्न केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीनं दिले दागिने

Video : सोनाली कुलकर्णीनं सांगितला ‘त्या’ इंटिमेट सीनचा किस्सा अन् रवीनं लपवला चेहरा

Omicron Variant : राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव चिंताजनक, नवीन 8 रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 48 वर

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती