AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जानेवारीत हिरवीगार झाडे ठेवण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी वेळीच करा

झाडांना जास्त थंडी सहन होत नाही. त्यामुळे जानेवारीच्या थंड हवामानात झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. या हिवाळ्यातही झाड हिरवेगार ठेवायचे असेल तर 5 गोष्टी वेळेवर करायला हव्यात. यामुळे तुमची झाडे टिकू शकतील.

जानेवारीत हिरवीगार झाडे ठेवण्यासाठी ‘या’ 5 गोष्टी वेळीच करा
| Edited By: | Updated on: Jan 11, 2025 | 7:47 PM
Share

हिवाळ्यात बहुतेक वनस्पती सुप्त अवस्थेत जातात, त्यामुळे त्यांच्या वाढीवर मोठा परिणाम होतो. जानेवारीच्या थंड हवामानात झाडांची विशेष काळजी घ्यावी लागते. हल्ली बागकामाची आवड सर्वांनाच असते. पण, झाडांची काळजी कशी घ्यावी, याची पूर्ण माहिती नसते. जेव्हा हवामान बदलते तेव्हा वनस्पतींची काळजी घेण्याची पद्धतही बदलावी लागते. तुम्ही झाडांची काळजीही घेतली नाही तर अतिशय वाईट परिणाम होतो, काही वनस्पतीही नष्ट होतात. हिवाळ्यातही असेच काहीसे पाहायला मिळते.

किंबहुना हिवाळ्यात बहुतेक वनस्पती सुप्त अवस्थेत जातात, त्यामुळे त्यांच्या वाढीवर मोठा परिणाम होतो. या वनस्पतीची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जेणेकरून त्या हिवाळ्याच्या हंगामातून सहज बाहेर पडू शकेल आणि वाढही करू शकेल. अशावेळी तुम्हाला मदत करण्यासाठी या 5 गोष्टी आहेत ज्या तुम्ही वेळीच करायला हव्यात.

जानेवारी महिन्यात कमी तापमान आणि वातावरणातील ओलावा यामुळे रोपांचे मोठे नुकसान होते. अशा वेळी रोपांच्या संरक्षणासाठी मल्चिंग आवश्यक असते. जे वनस्पतींच्या सभोवतालचा अतिरिक्त ओलावा शोषून जमिनीतील तापमान टिकवून ठेवते आणि मुळांना पुरेशी उष्णता देते. यासाठी तुम्ही 3 ते 5 इंच जाडीच्या थराने मल्चिंग करू शकता.

थंड हवामानात रोपांना नेहमीप्रमाणे पाणी देणे टाळावे, अन्यथा झाडाचे मूळ सडू शकते. हिवाळ्यात गरज असेल तेव्हाच रोपांना पाणी द्यावे. माती पूर्णपणे कोरडी पडली की पाणी द्यावे. त्यामुळे पाणी देण्यापूर्वी जमिनीला पाण्याची गरज आहे की नाही, हे एकदा तपासून घ्यावे. जमिनीचा पृष्ठभाग 2-3 इंच कोरडा असेल तर पाणी देणे चांगले.

अनेकवेळा थंड वाऱ्यामुळे झाडाची पाने सुकतात. हळूहळू बागेच्या भांड्यातील रोपे मरायला लागतात. कारण कोरडी व मुरडलेली पाने वनस्पतीतून ऊर्जा व पोषक द्रव्ये काढण्याचे काम करतात. त्यामुळे इतर पानेही खराब होतात. झाडाचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कात्रीने पाने व फांद्या छाटणी करावी.

माणसांप्रमाणेच वनस्पतींनाही जानेवारीत थंडीचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे रोपे घरातच ठेवावीत. कारण, घराच्या आतील तापमान बाहेरच्या तुलनेत कमी असते. यामध्ये वनस्पती वाढू शकतात. रोपे उन्हाच्या ठिकाणी किंवा खिडकीजवळ घरात ठेवा.

आता तुम्ही विचार करत असाल की घरात भांडी ठेवून तुम्ही झाडे वाचवू शकता, पण बागेतील वनस्पतींचे संरक्षण कसे करायचे. याचे उत्तर असे की, हिवाळ्यात बागेत लावलेली रोपे आवरणाने झाकून ठेवावीत, असे केल्याने रोपाची वाढ चांगली होते. पॉलीथिलीन, फॅब्रिक प्लांट कव्हर, पुठ्ठ्याचे डबे किंवा प्लॅस्टिकच्या डब्यांनी बाहेरील वनस्पती झाकणे अजिबात अवघड नाही.

Follow Us
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय...
CM Fadnavis On Water Scarcity : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे...
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यामध्ये भाजपचे लोक... जरांगे पाटील स्पष्टच बोलले
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी बैठकीत...
मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? मुंबई, पुणे, नागपूरसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठीत!
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक
भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच... मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, आता...
सोलापुरात ऊस दराचा तिढा कायम! जयकुमार गोरेंसोबतची बैठक निष्फळ, कारखानदारांनी मागितली 2 दिवसांची मुदत