AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिरव्या रंगाचा सूट घालायचाय? या गोष्टी लक्षात ठेवा, लुक होईल परफेक्ट

श्रावणात हिरव्या रंगाचा ड्रेस म्हणजे फक्त परंपरेची जपणूक नाही, तर सौंदर्य आणि स्टाईलचा मिलाफ आहे. त्यामुळे या टिप्स लक्षात घेऊन जर तुम्ही हिरव्या सूटला घातलत तर तुमचं व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसेल.

हिरव्या रंगाचा सूट घालायचाय? या गोष्टी लक्षात ठेवा, लुक होईल परफेक्ट
| Edited By: | Updated on: Jul 10, 2025 | 3:23 PM
Share

श्रावन महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. भगवान शिवाची आराधना, व्रत-वैकल्यं आणि हरित वातावरण यामुळे महिलांसाठी हा महिना खास असतो. याच काळात हिरवा रंग विशेष महत्त्वाचा मानला जातो कारण तो निसर्ग आणि भोलेनाथ यांचं प्रतीक आहे. महिलाही या महिन्यात हिरव्या रंगाचे कपडे, विशेषतः हिरवा सूट, घालण्यास प्राधान्य देतात. मात्र फक्त हिरव्या सूटचा रंगच नव्हे, तर तो योग्य पद्धतीने कसा स्टाईल करायचा याकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे.

आजच्या फॅशनच्या युगात सूटचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत प्लाझो सूट, स्ट्रेटकट, अनारकली, पंजाबी स्टाईल, पॅन्ट सूट इत्यादी. तुम्ही कोणत्या वातावरणात किंवा कार्यक्रमासाठी सूट घालणार आहात, त्यानुसार स्टाइल निवडा. जर तुम्हाला आरामदायक परंतु एलिगंट लुक हवा असेल, तर प्लाझो सूट किंवा पॅन्ट सूट उत्तम पर्याय ठरतो. ऑफिस किंवा कोणत्याही फॉर्मल कार्यक्रमासाठी ‘बॉस लेडी लुक’ म्हणून पॅन्ट सूट प्रभावी ठरतो.

दुपट्टा हा भारतीय पारंपरिक पोशाखाचा अनिवार्य भाग आहे. हिरव्या सूटसोबत दुपट्टा जोडताना नेहमी कॉन्ट्रास्ट रंग विचारात घ्या. उदा. हिरव्या सूटसोबत लाल, गुलाबी किंवा पिवळा दुपट्टा तुमच्या लुकमध्ये रंगत आणू शकतो. पूजा किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा कॉम्बिनेशन आकर्षक ठरेल.

ज्वेलरी निवडताना आजकाल मिक्स-एंड-मॅचचा ट्रेंड आहे. त्यामुळे तुम्ही सूटला पूर्णपणे मॅच करणारी ज्वेलरी घालण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, हिरव्या सूटसोबत लाल कुंदन, गोल्डन किंवा पिवळ्या कुंदनची ज्वेलरी खूप छान दिसते. जर सूट हेवी डिझाइन असले तर ज्वेलरी सिम्पल ठेवा आणि जर सूट सिंपल असेल तर स्टेटमेंट ज्वेलरी वापरून ड्रेसिंगला उठाव आणा.

मेकअपसाठी, हिरवा रंग आधीच आकर्षक असल्यामुळे जास्त ब्राइट मेकअप टाळावा. न्यूड किंवा पीच शेडची लिपस्टिक, विंग्ड आयलाइनर आणि सटल ब्लश चेहऱ्याला फ्रेश लुक देतो. मेकअप जितका नैसर्गिक तितका सुंदर.

हेयरस्टाइलसुद्धा तुमच्या लुकचा महत्त्वाचा भाग असतो. ह्या सीझनमध्ये सॉफ्ट कर्ल्स, सिम्पल अंबोडा किंवा सागरवेणीसारखी क्लासिक हेअरस्टाइल्स फारच शोभून दिसतात. त्यात काही पारंपरिक किंवा फ्लोरल अ‍ॅक्सेसरीज जोडल्यास लुक अजून उठून दिसतो.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.