AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कडक उन्हातसुद्धा हिरवीगार राहील तुळस, फक्त ‘या’ टिप्स आणि ट्रिक्स करा फॉलो

उन्हाळ्यात रोपांची खुप काळजी घ्यावी लागते. विशेषत: तुळशीचे रोप कारण उन्हाळ्यात तुळशीचे रोप लवकर सुकते. अशा परिस्थितीत तुळशीचे रोप हिरवीगार राहण्यासाठी तसेच निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेऊन त्या फॉलो केल्यास कडक उन्हात देखील तुळशीचे रोप हिरवेगार राहील.

कडक उन्हातसुद्धा हिरवीगार राहील तुळस, फक्त 'या' टिप्स आणि ट्रिक्स करा फॉलो
तुळसImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 13, 2025 | 5:15 PM
Share

सनातन धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्व दिले जाते. हिंदू मान्यतेनुसार तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे तुळशीच्या रोपाला भारतीय घरांमध्ये धार्मिक महत्त्व आहे. त्यासोबतच आयुर्वेदात तुळशीच्या रोपाला “औषधी वनस्पतींची राणी” म्हटले जाते कारण ती औषधी गुणधर्मांनीही परिपूर्ण असल्याने अनेक रोगांना प्रतिबंधित करते. तसेच तुळशीचे रोप घरात लावल्याने वातावरण शुद्ध होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. पण उन्हाळ्यात तुळशीचे रोप लवकर कोमेजायला लागते. प्रखर सूर्यप्रकाश, पाण्याचा अभाव आणि वाढत्या तापमानामुळे त्याची पाने पिवळी पडतात आणि कधीकधी संपूर्ण रोप सुकून जाते.

जर तुम्हाला उन्हाळ्यातही तुमचे तुळशीचे रोप हिरवेगार आणि निरोगी राहावे असे वाटत असेल तर तुम्हाला काही विशेष काळजी घ्यावी लागेल. आज या लेखात आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही उन्हाळ्यातही तुमचे तुळशीचे रोप निरोगी आणि हिरवेगार ठेवू शकता.

रोप योग्य ठिकाणी ठेवा

तुळशीच्या रोपाला योग्य सूर्यप्रकाश देणे आवश्यक असले तरी उन्हाळ्यात जास्त सूर्यप्रकाश तुळशीच्या रोपाला नुकसान पोहोचवू शकतो. अशा परिस्थितीत तुळशीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश मिळेल आणि दुपारच्या तीव्र सूर्यप्रकाशापासून रोपाचे संरक्षण होईल. तसेच तुमच्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप उघड्यावर ठेवले असेल तर सावलीसाठी हिरव्या जाळ्याचा वापर करा. अशाने तुळशीच्या रोपाला तीव्र सुर्यप्रकाशापासुन सरंक्षण होईल. तसेच तुळशीच्या रोपाला बाल्कनीत किंवा खिडकीजवळ ठेवा, जिथे हलका सूर्यप्रकाश आणि ताजी हवा मिळेल.

योग्य प्रमाणात पाणी द्या

उन्हाळ्यात तुळशीच्या रोपांना पाण्याची सर्वाधिक गरज असते. परंतु जास्त पाणी दिल्यास मुळे कुजू शकतात. म्हणून दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. दुपारी पाणी देणे टाळा, कारण गरम मातीला पाणी दिल्यास मुळांना नुकसान होऊ शकते. याशिवाय, कुंडीतील माती तपासा. माती कोरडी वाटली तरच पाणी घाला. तुळशीच्या पानांवर हलके पाण्याची फवारणी करा, यामुळे पाने हिरवी आणि ताजी राहतील.

योग्य माती वापरा

तुळशीच्या रोपाला चांगल्या वाढीसाठी सुपीक आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी माती आवश्यक असते. अशा परिस्थितीत, शेणखत, सेंद्रिय खत आणि वाळू मिसळून माती हलकी आणि सुपीक बनवा. तुळशीच्या कुंडीत दर १५ दिवसांनी खत घाला, जेणेकरून झाडाला आवश्यक पोषण मिळत राहील. जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पानांचा थर किंवा वाळलेल्या गवताने जमिन झाकून ठेवा.

अति उष्णतेमध्ये तुळशीची पाने तोडणे टाळा.

उन्हाळ्यात तुळशीचे रोप आधीच तणावाखाली असते, म्हणून जर तुम्ही त्याची जास्त पाने तोडली तर ते झाड कमकुवत होऊ शकते. जास्त पाने तोडू नका. गरजेनुसारच तुळशीची पाने तोडावीत. नवीन कोवळी पाने तोडण्याऐवजी आधीची जुनी पाने वापरा.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.