AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mental Health Tips: मानसिक आरोग्यासाठी उच्च रक्तदाब अतिशय घातक, जाणून घ्या कारण

उच्च रक्तदाबामुळे मेंदू आणि हृदय यासारख्या शरीराच्या महत्वपूर्ण भागांना नुकसान पोहचू शकते. जाणून घेऊया उच्च रक्तदाबाची लक्षणे काय आहेत.

Mental Health Tips: मानसिक आरोग्यासाठी उच्च रक्तदाब अतिशय घातक, जाणून घ्या कारण
प्रातिनिधिक
| Updated on: Oct 06, 2022 | 4:32 PM
Share

नवी दिल्ली:  हायपरटेन्शन म्हणजेच उच्च रक्तदाबाचा (high blood pressure) त्रास. यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब वाढतो. रक्तदाब एका विशिष्ट वेगाने होणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. शरीरातील नॉर्मल ब्लड प्रेशर लेव्हल ही 120/80mmHg असले पाहिजे. जर ब्लड प्रेशर किंवा रक्तप्रवाह या पातळीपेक्षा अधिक असेल तर शरीरात हायपरटेन्शनची (hypertension) समस्या निर्माण होते. उच्च रक्तदाबामुळे मेंदू आणि हृदय या शरीराच्या (health)महत्वपूर्ण भागांचे नुकसान होऊ शकते.

डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत वेदना होणे, नाकातून रक्त येणे, चक्कर येणे इत्यादी उच्च रक्तदाबाचे संकेत आहेत. ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाबाचे मोजमाप हे स्फिग्मोमॅनोमीटरने केले जाते, त्याला ब्लडप्रेशर मीटरही म्हटले जाते. ब्लड प्रेशर वाढण्याचे नेमके कारण काय आणि ते वाढण्यापासून रोखावे कसे, याचे उपाय जाणून घेऊया.

ताण आणि अनियंत्रित खाणेपिणे –

मेडिकल न्यूज टुडे नुसार, ताण आणि अनियंत्रित खाणे-पिणे हे हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण आहे. हाय ब्लड प्रेशरमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताचा वेग वाढतो, अशा परिस्थितीत रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहावा यासाठी हृदयाला जास्त कार्य करावे लागते. ज्यामुळे हृदयावर अधिक दाब पडतो. त्यामुळे हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो.

उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या समस्या :

– हार्ट ॲटॅक किंवा स्ट्रोक

– मेटाबॉलिक सिंड्रोम

– एखादी गोष्ट समजण्यात अडचण येणे

– स्मरणशक्ती कमकुवत होणे

– डिमेंशियाचा त्रास

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचे उपाय :

– वजन कमी करणे व निरोगी बीएमआय राखणे.

– दररोज नियमितपणे व्यायाम करणे.

– मीठ, साखर आणि फॅट्सचे सेवन कमी करणे.

– मद्यपान आणि धूम्रपान न करणे.

– कॅफेनयुक्त पेयांचे सेवन न करणे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.