AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाय सुजत असतील तर हे असेल गंभीर कारण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

शरीराच्या कोणत्याही भागात सूज येत असेल तर त्यामागे काही गंभीर कारण असू शकते. अशा समस्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कधी कधी चे शरिरात काहीतरी गंभीर परिणाम होत असल्याचे देखील संकेत देत असते. त्यामुळे कोणतेही गंभीर परिणाम होण्याआधी त्याकडे तुम्ही लक्ष देऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

पाय सुजत असतील तर हे असेल गंभीर कारण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
swollen-feet
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 11, 2023 | 5:10 PM
Share

Health News : कधी कधी लोक पायाला सूज आली तर त्याकडे दुर्लक्ष करतात. पण ही छोटीशी समस्या कधी कधी गंभीर आजार बनू शकते. याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. जास्त चालल्याने, दुखापत झाली किंवा बराच वेळ उभे राहिल्याने देखील पाय सुजतात. पण जर नेहमीच पाय सूजत असतील तर याकडे तुम्ही अधिक लक्ष दिले पाहिजे. पायाला सूज येण्या मागची कारणे काय असू शकतात जाणून घेऊयात.

1. हायपोथायरॉईडीझम

जेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो तेव्हा थायरॉईड संप्रेरके आणि त्यांची प्रथिने जास्त प्रमाणात रक्तवाहिन्यांमध्ये तयार होऊ लागतात. त्यामुळे शरीरात द्रव जमा होण्यास सुरुवात होते. हायपोथायरॉईडीझमचाही चयापचयावर परिणाम होतो. किडनीच्या रक्तप्रवाहावरही याचा परिणाम होऊ लागतो. त्यामुळे पाणी टिकून राहण्याची समस्या निर्माण होते आणि पायांना सूज येऊ शकते.

2. पोषक तत्वांचा अभाव

पायाला सूज येत असेल तर ते शरीरातील पोषक तत्वांच्या कमतेरतेमुळे असू शकते. आहारात शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळत नसतील तर पायाला सूज येऊ शकते. याशिवाय सोडियम युक्त अन्नपदार्थांचे सेवन केल्यानेही शरीरात पाणी साचते. त्यामुळे पाय सुजतात.

3. मूत्रपिंड निकामी होणे

जेव्हा मूत्रपिंड निकामी होतात तेव्हा रक्तातून लघवी फिल्टर करता येत नाही, त्यामुळे रक्तातील अल्ब्युमिन प्रोटीनची पातळी कमी होते आणि लघवीची पातळी वाढू लागते. अशा स्थितीत पायात सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. पचनाशी संबंधित समस्या देखील दिसू शकतात, ज्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.

4. यकृताचे नुकसान

यकृत खराब झाले तरी त्याच्या कार्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या दिसून येतात. रक्ताभिसरण मंद होते. त्यामुळे यकृताकडे रक्त वाहून नेणाऱ्या नसांवर खूप दबाव येतो. शिरांवर वाढलेल्या दबावामुळे, पायांमध्ये द्रव साठू लागतो. ज्यामुळे सूज येते.

Follow Us
50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा
Sanjay Raut । 50 कोटींचा हमी भाव, 15-15 कोटी आधी!; संजय राऊतांचा खासदार खरेदीवर मोठा गौप्यस्फोट
ऑपरेशन टायगरला झटका! 100 कोटींचं आमिष नाकारून राजाभाऊ वाजे ठाकरेंसोबतच
Rajabhau Waje | ऑपरेशन टायगरला झटका! 100 कोटींचं आमिष नाकारून राजाभाऊ वाजे ठाकरेंसोबतच
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंचा मोठा डाव, अरविंद सावंतांच्या माध्यमातून थेट... दिल्लीत काय घडतंय?
मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला; अंधारेंचा स्फोटक दावा
Sushma Andhare On BJP | मुख्यमंत्रिपदासाठी भस्मासूर निर्माण केला...; 6 खासदारांच्या बंडाच्या चर्चांदरम्यान सुषमा अंधारेंचा स्फोटक दावा!
भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नाही; नेमकं घडतंय काय?
Shivsena Crisis | भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नसल्याची माहिती; नेमकं घडतंय काय?
ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल!
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार