Sanjay Raut : हे साले भोXXचे लोक जात आहेत… डोन्ट कट… संजय राऊतांची जीभ घसरली, घणाघाती हल्ला
Sanjay Raut : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे थेट 6 खासदार फुटणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, बोलताना त्यांची जीभ घसरली असल्याचे समोर आले आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत असत आहेत. अशातच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे 9 पैकी थेट 6 खासदार फुटणार असल्याचे बोलले जात आहे. आता यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली आहे. त्यांनी दगाबाजी करणाऱ्या खासदारांना चांगलेच सुनावले आहे.
राजाभाऊ वाजे यांचे संजय राऊतांनी केले कौतुक
माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राजाभाऊ वाजेंचे कौतुक केले आहे. “राजाभाऊ वाजेंचं कौतुक केलं पाहिजे. ते पहिल्या दिवसांपासून सांगत आहेत आम्ही उद्धव ठाकरेंसोबत आहे. ते दिल्लीत उतरले. मीडियाने त्यांना विचारलं. त्यावेळी त्यांनी तेच सांगितलं. याला निष्ठा म्हणतात. आज खासदार असू नसू. पण पक्षाने जे दिलं ते विसरता येणार नाही” असे संजय राऊत म्हणाले.
पुढे संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी आम्हाला भावासारखं वागवलं. बाळासाहेबांनी आम्हाला वडिलांसारखं प्रेम केलं. हे साले भोसडीचे लोकं कोण जातात हे, डोन्ट कट. कट मत करना हे बेईमान लोक आहे. हे बेईमान आहेत. त्यांच्या रक्तात बेईमानी आहे. मी कोणत्या पार्टीचं आणि व्यक्तीचं नाव घेत नाही. सध्याच्या लोकशाही व्यवस्थते, आयोग, सुप्रीम कोर्ट आणि लोकसभा अध्यक्षांची काय हैसियत आहे माहीत आहे.”
गद्दारी कराल तर याद राखा…
“शिवसेना आमची आई आहे. शिवसेनेशी बेईमानी करणार असेल तर त्यांना सोडणार नाही. जे करायचं ते करा. मोदी किंवा शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडून आले नाही. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले आहेत. मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. गद्दारी कराल तर याद राखा. काल रात्री १५ कोटी मिळाले. त्यानंतर चार्टेड फ्लॅटने नांदेड आणि पुण्यातून दिल्लीत आले. उद्या आमच्या संसदीय समितीची बैठक आहे. सर्वांना व्हिप जारी केला आहे. मिटिंग नंतर आम्ही निर्णय घेणार आहे” असे संजय राऊत म्हणाले.
