AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: आता सोडणार नाही… राऊत संतापले… कायद्याचा बडगा… बंडखोरांना तो थेट इशारा

Sanjay Raut on Uddhav Thackeray Shivsena Split: अजून कोणत्याही खासदाराने आम्हाला पक्ष सोडत असल्याचे सांगितले नाही. पण अशा पद्धतीने पक्ष तोडले, फोडले जात असतील, तर आता सोपं नाही असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

Sanjay Raut: आता सोडणार नाही... राऊत संतापले... कायद्याचा बडगा... बंडखोरांना तो थेट इशारा
संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभा वाजेImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 17, 2026 | 11:20 AM
Share

Sanjay Raut on Uddhav Thackeray Shivsena Split: उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांनी राजकारण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडत आहेत. खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे यांची संयुक्त पत्रकार परिषद दिल्लीत सुरू आहे. त्यात या पक्ष फुटीवर त्यांनी भाष्य केले आहे. या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. अजून कोणीही पक्ष सोडून गेल्याची माहिती दिली नसल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी राऊतांनी मोठा इशारा दिला.

हा नादानपणा खपवून घेणार नाही

अशा पद्धतीने पक्ष तोडले, फोडले जात असतील, तर या देशात निवडणुका लढण्याला अर्थ नाही. आमच्या खासदारांची जी नावे येतात ते कुठे आहेत माहीत नाही. कुणी म्हणतात, दिल्लीत आहेत. कुणी म्हणतात त्यांच्या मतदारसंघात आहे. हे सर्व खासदार मशाल चिन्हावर निवडून आले आहेत. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले. आधी फूट पडली, तेव्हा मोदींच्या नावावर निवडणूक लढवली. मॅनडेटच्या विरोधात आहे, असं सांगितलं जात होतं. आता जे खासदार आमदार असतील ते पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निवडून आले. आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कुणालाही बेईमानी करण्याचा अधिकार नाही. १५-२० कोटी घेऊन. या क्षणी कुणावर आरोप करणार नाही. मागे जे झालं, त्याची पुनरावृत्ती होणरा असेल तर जनता गप्प बसणार नाही. शिवसेना नाहीच. जो राडा व्हायचा तो होईल. ही गांडूगिरी, नादाणपणा खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड दम खासदार संजय राऊत यांनी दिला.

तर राजीनामा फेका

उद्धव ठाकरेंनी सर्व काही दिलं. रक्त,पैसा दिला. मेहनत घेतली. तरीही त्यांच्याबाबत अशा बातम्या येत असतील तर त्याचं त्यांनी खंडन करावं. आता त्यांना सोडणार नाही. कोणी फुटणार असेल तर सोडणार नाही. राज्यातील जनता चूप बसणार नाही. हा काय तमाशा आहे का. जायचं त्यांनी राजीनामा द्या. तुम्ही आमच्या पार्टीतून निवडून आला आहे. तीन वेळा पडणाऱ्याला खासदार बनवलं. एक पळून जात होता त्याला खासदार बनवलं.आम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. ओम बिर्लांना पत्र पाठवलं आहे. आम्ही दिल्लीत राहणार आहोत, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी