AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला ही आहे खूप लोणचे खाण्याची सवय तर सावधान, या आजारांचा वाढतो धोका

लोणचे बनवण्यासाठी जास्त तेल वापरले जाते. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या तेलामध्ये ट्रान्स फॅट असते. या ट्रान्स फॅटमुळे लोणच्याचे शेल्फ लाइफ वाढते. पण एलडीएलमुळे कोलेस्टेरॉल वाढते. जास्त लोणचे खाल्ल्याने आरोग्यास कोणते धोके आहेत ते जाणून घेऊया.

तुम्हाला ही आहे खूप लोणचे खाण्याची सवय तर सावधान, या आजारांचा वाढतो धोका
Pickle
| Updated on: Nov 23, 2023 | 7:18 PM
Share

Pickles side effect : लोणचे शब्द ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. लोणचे वेगवेगळ्या फळाचे बनवले जाते. आंबा, लिंबू,आवळा, गाजर, कारले यासह अनेक प्रकारचे लोणचे बाजारात उपलब्ध आहेत. भारतीय जेवणाच्या ताटात लोणच्याचा समावेश केला जातो. पण हे आंबट आणि चविष्ट चवीचे लोणचे आरोग्यालाही हानी पोहोचवू शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, खूप लोणची खाण्याची सवय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

नाश्त्यामध्ये पराठ्यासोबत लोणचे खाणे किंवा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात लोणचे खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. जास्त लोणचे खाण्याची सवय तुम्हाला आजारी पाडू शकते, असे डॉक्टर सांगतात.

जास्त सोडियम

लोणच्यात असलेल्या उच्च सोडियममुळे रक्तदाब वाढते. जास्त लोणचे खाल्ल्याने अतिरिक्त सोडियम क्लोराईडचे सेवन वाढते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि इतर आजार होऊ शकतात.

मूत्रपिंडावर परिणाम

नियमित मध्यम आकाराच्या आंब्याच्या लोणच्यामध्ये 569 मिलीग्राम सोडियम असते. आपल्या शरीराला दररोज 2,300 मिलीग्रामची आवश्यकता असते. लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्यास आहारासोबत सोडियमचे प्रमाणही वाढते. त्यामुळे पाणी टिकून राहणे, पोटात सूज येणे, उच्च रक्तदाब आणि किडनीवर परिणाम दिसून येतो. ज्या पदार्थांमध्ये मीठ जास्त असते ते कॅल्शियमचे शोषण कमी करतात. त्यामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात.

उच्च कोलेस्टरॉल

लोणची बनवताना तेलाचा जास्त वापर होतो. हे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते. लोणचे वारंवार खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका असतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उच्च कोलेस्ट्रॉल केवळ हृदयालाच नाही तर यकृतालाही हानी पोहोचवते. लोणच्याच्या तेलात ट्रान्स फॅट असते, जे एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करते. त्यामुळे तुम्ही लोणचे खात असाल तर ते मर्यादित प्रमाणातच खा. प्रत्येक वेळी आपल्या आहारात याचा समावेश न करण्याचा प्रयत्न करा.

गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.