AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beauty Tips: चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करायच्या असतील तर आजपासून ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा

चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करायच्या असतील तर आजपासून या पदार्थांचा आहारात समावेश करा, त्वचेला आणि आरोग्यालाही फायदा होईल.

Beauty Tips: चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करायच्या असतील तर आजपासून 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी सोपे उपाय.
Siddhi Bobade
Siddhi Bobade | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 17, 2022 | 6:57 PM
Share

चेहऱ्यावर सुरकुत्या (Wrinkles) वेळेपूर्वी पडल्या तर व्यक्ती असलेल्या वयापेक्षा मोठी दिसते. सुरकुत्याच्या समस्येवर (Wrinkles on Skin) मात करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या त्वचेची निगा राखण्याची गरज आहे. तुम्हाला तुमची दिनचर्या सुधारणं आवश्यक आहे, तसेच त्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, जे तुमची त्वचा (Skin) निरोगी आणि चमकदार बनवू शकतात.वाढत्या वयाबरोबर त्वचेवर सुरकुत्या येणं सामान्य गोष्ट आहे, पण जर तुमच्या त्वचेवर अकाली सुरकुत्या दिसू लागल्या असतील, किंवा तुमची त्वचा सैल होऊ लागली असेल, तर ही समस्या तुमच्या काही चुकीच्या सवयींमुळे होऊ लागली असेल. अकाली सुरकुत्या पडल्याने तुम्ही वृद्ध दिसू शकता आणि त्यामुळे तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दिनचर्यामध्ये सुधारणा करण्याबरोबरच, तुम्हाला खाण्याच्या सवयी सुधारणं खूप महत्वाचं आहे.हेल्दी फूड तुमच्या शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे पुरवते, ज्यामुळे तुमचे आरोग्य तर सुधारतेच पण तुमची त्वचाही निरोगी बनते. तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार बनवणाऱ्या पदार्थांबद्दल येथे जाणून घेऊया.

बदाम

बदाम हे आरोग्य आणि त्वचेसाठी चांगले मानले जाते. बदामा व्हिटॅमिन ई च्यागुणांनी समृद्ध असतात, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात. ते तुमची त्वचा घट्ट ठेवण्याचे काम करतात, तसेच तुमची त्वचा हायड्रेट ठेवतात. चांगल्या त्वचेसाठी दररोज दोन बदाम नियमित भिजत ठेवा आणि बारीक करून दुधात मिसळून प्या. यामुळे तुमचे आरोग्य आणि त्वचा दोन्ही निरोगी राहतील.

ब्रोकोली

ब्रोकोलीचाही आहारात समावेश करावा. त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आढळते जे कोलेजनच्या निर्मितीसाठी उपयुक्त असल्याचे मानले जाते. तसेच त्वचेत घट्टपणा येतो. सॅलड म्हणून ब्रोकोलीचा आहारात समावेश करू शकता.

पालक

पालक हे हायड्रेटिंग आणि अँटीऑक्सिडंट युक्त अन्न मानले जाते. हे बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. पालक कोलेजनचे उत्पादन वाढवण्याचेही काम करते. यामुळे त्वचा घट्ट होते आणि वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो. पालकाची भाजी बनवून त्याचा आहारात समावेश करू शकता.

पपई

पपई खाल्ल्यानेच नाही तर त्वचेवर त्याचा वापर केल्यानेही खूप फायदा होतो. पपईमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई आणि के तसेच अनेक प्रकारचे खनिजे आढळतात, जे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्याचे काम करतात. पपईमध्ये पॅपेन नावाचे एन्झाइम असते जे फ्री रॅडिकल्सचा प्रभाव कमी करते. त्वचा तरुण बनवते. त्यामुळे अनेकजण पपईचे फेशियलही करतात. त्याचा नियमित आहारात समावेश करा. त्वचेवर देखील वापरा.

Follow Us
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा