सकाळी नाश्त्यामध्ये ब्राऊन ब्रेडऐवजी ‘हे’ ब्रेड खा, वजन झपाट्याने कमी होईल

निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा असतो. सकाळच्या नाश्त्याची प्रत्येकाला फार गरज असते.

सकाळी नाश्त्यामध्ये ब्राऊन ब्रेडऐवजी 'हे' ब्रेड खा, वजन झपाट्याने कमी होईल
ब्रेड

मुंबई : निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा असतो. सकाळच्या नाश्त्याची प्रत्येकाला फार गरज असते. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. मात्र, बरेचजण सकाळी घरी काही तयार करण्यापेक्षा नाश्त्यामध्ये ब्रेड वगैरे खाण्यावर भर देतात. मात्र, तुम्ही नेमके कोणते ब्रेड खात आहात हे सर्वात महत्वाचे आहे. कारण बाजारात वेगवेगळ्या प्रकारे ब्रेड उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमचे वजन वाढण्याची देखील शक्यता असते. (Include multi grain bread in breakfast will be beneficial for weight loss)

पांढरे ब्रेड

पांढऱ्या रंगाच्या ब्रेडमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. कारण हे सर्व प्रकारचे पीठ आणि मैदा एकत्र करून तयार केले जाते. बहुतेक घरात पांढर्‍या ब्रेडचा वापर केला जातो. हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. याशिवाय वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही या ब्रेडचा आहारात समावेश केला तर त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. उलट हे ब्रेड खाण्यामुळे तुमचे वजन वाढेल.

ब्राऊन ब्रेड

बाजारात उपलब्ध असलेल्या बर्‍याच ब्राऊन ब्रेडमध्ये कोणत्याही प्रकारचे पौष्टिक मूल्य नसते. ज्या ब्रेडचा पॅकवर गहू असे लिहिले नाही ते ब्रेड खरेदी करु नये. बहुतेक ब्रेडमध्ये ब्राऊन फूड कलरचा वापर केला जातो. हे तुमच्या आरोग्यासाठी अजिबात फायदेशीर नाही. नेहमीच ज्या ब्रेडचा पॅकवर गहू असे लिहिले आहे तेच ब्रेड खरेदी करा. कारण ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे ब्रेड पौष्टिक आणि फायबरने समृद्ध असते.

मल्टी ग्रेन ब्रेड

प्रामुख्याने मल्टी ग्रेन ब्रेडमध्ये ओट्स, बार्ली बिया आणि गहू असतात आणि त्यात भरपूर फायबर असतात. हे खाल्ल्याने तुमचे पोट बर्‍याच काळासाठी भरते तसेच तुमची पाचन क्रिया देखील बळकट होते. यामुळे तुमचे वजनही वाढत नाही. त्यामुळे शक्यतो आहारात इतर ब्रेड टाळून मल्टी ग्रेन ब्रेडचा समावेश केला पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

(Include multi grain bread in breakfast will be beneficial for weight loss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI