Diwali 2020 | बॉलिवूड अभिनेत्रींच्या ‘इंडो-वेस्टर्न’ लूकसह दिवाळीत सजा ‘पिक्चर परफेक्ट’!

दिवाळीच्या उत्साहातही विशेषतः महिलांना त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलबद्दल सर्वाधिक चिंता वाटत असते.

  • Updated On - 12:51 pm, Mon, 7 December 20 Edited By: नम्रता पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
Diwali 2020 | बॉलिवूड अभिनेत्रींच्या ‘इंडो-वेस्टर्न’ लूकसह दिवाळीत सजा ‘पिक्चर परफेक्ट’!

मुंबई : दिवाळी अगदी दोन दिवसांवर आल्याने प्रत्येकाच्या घरात लगबग सुरू झाली आहे. यंदा 14 नोव्हेंबरला दिवाळी (Diwali 2020) साजरी केली जाणार आहे. दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाला आपण खास आणि सुंदर दिसावे, असे वाटत असते. यासाठी खूप दिवस आधीच आपली तयारी सुरू झालेली असते. दिवाळीच्या विशेष प्रसंगी आपण सगळेच पार्टी, पूजा आणि इतर गोष्टींबद्दल खूप उत्साही असतो (Indo Western Look For Diwali).

पण या सगळ्यात सर्वांत जास्त चिंता असते ती आपण काय कपडे घालावेत आणि कसे तयार व्हावे याची…दिवाळीच्या उत्साहातही विशेषतः महिलांना त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलबद्दल सर्वाधिक चिंता वाटत असते. तुम्हालाही अशीच चिंता वाटत असेल तर, या बॉलिवूड अभिनेत्रींचे ‘इंडो वेस्टर्न’ लूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

जान्हवी कपूर

जर तुम्हाला दिवाळीत काही चमकदार आणि रेडीयंट रंगाचे कपडे घालायचे असतील, तर जान्हवी कपूरची ही लाल रंगाची साडी एक चांगला पर्याय आहे. जान्हवी कपूरची लाल साडी अर्पिता मेहता यांनी डिझाईन केली आहे (Indo Western Look For Diwali).

 

कतरिना कैफ

दिवाळीच्या वेळी जर तुम्ही झटपट तयार व्हायचे असेल तर चमकदार आणि स्क्विंटेड साड्या वापरुन पाहा. नेसण्यास सोप्या आणि वजनाने हलक्या असणाऱ्या या साड्या आपल्या सौंदर्यात भर टाकतात. कतरिना कैफनेदेखील नुकत्याच एका फोटोशूट दरम्यान शेडडेड डिझाइनची साडी परिधान केली होती.

 

मलायका अरोरा

जर तुम्हाला गडद रंग आवडत असतील, तर दिवाळीच्या संध्याकाळी या रंगाची साडी नक्की ट्राय करू शकता. बॉलिवूड दिवा, अभिनेत्री मलायका अरोराची ही साडी दिवाळी संध्याकाळसाठी अगदी ‘पिक्चर परफेक्ट’ आहे (Indo Western Look For Diwali).

 

करिश्मा कपूर

साड्यांऐवजी जर तुम्ही ड्रेसच्या शोधात असाल, तर अभिनेत्री करिश्मा कपूरचा हा लूक तुमच्या कामी येईल. सूटसुटीत आणि वजनाने हलका असणारा करिश्मा कपूरचा हा लाल रंगाचा कुर्ता आणि सलवार दिवाळीसाठी एक चांगला पर्याय आहे.

 

मीरा कपूर

शाहीद कपूरची पत्नी मीरा कपूर नेहमीच तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. जर, तुम्हाला तुमचा नेहमीचा अनारकली सूट एका वेगळ्या लूकने ट्राय करायचा असेल तर, मीराचा हा लूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या ड्रेसची खास गोष्ट म्हणजे मीरा राजपूतने अनारकली सूटसह जॅकेट परिधान करत ‘इंडो वेस्टर्न’चा अनोखा मिलाफ साधला आहे.

(Indo Western Look For Diwali)