AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women’s Day | महिला दिनी तुमच्या आयुष्यातील महिलांना काय Gift देताय? तुम्हाला उपयोगी पडतील, अशा काही खास गोष्टी

Women's day gift | महिला दिनानिमित्त तुम्हाला तुमच्या आयुष्यातील महिलांना काही भेटवस्तू द्यायची असेल तर काय देणार, असा प्रश्न पडला असेल तर तुमच्यासाठी इथे काही आयडियाज...

Women's Day | महिला दिनी तुमच्या आयुष्यातील महिलांना काय Gift देताय? तुम्हाला उपयोगी पडतील, अशा काही खास गोष्टी
Image Credit source: social media
| Updated on: Mar 07, 2023 | 6:15 AM
Share

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women’s Day)  यंदा जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. कळत न कळत आंतरआपल्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या महिलांची (Ladies) आठवण आगत्याने काढण्याचा हा दिवस आहे. अनेकदा आपल्याला भावना व्यक्त करताना शब्दांचा तोकडे पणा जाणवतो. अशा वेळी एखादं लहानसं गिफ्ट देऊन , त्याला थोडी शब्दांची जोड देऊन हा दिवस साजरा करता येईल. तुम्ही ज्यांचे आभार मानू इच्छिता, ज्यांचं कौतुक करु इच्छिता अशा महिलांना आजच्या दिवशी काही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर पुढील काही आयडिया तुमच्या उपयोगी पडू शकतात.

फिटनेस गॅझेट

अनेक महिला रोजच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशसा महिलांना फिट राहण्यासाठी फिटनेस बँड किंवा इतर फिटनेसचं गॅझेट गिफ्ट म्हणून देता येईल. तर काही चांगली पुस्तकही देता येतील.

एखाद्या ट्रिपचा प्लॅन

महिला दिनानिमित्त तुमच्या आयुष्यातील महिलेला काही गिफ्ट वाउचर देता येतील. किंवा महिलेसाठी एखाद्या ट्रिपचा प्लॅन बुक करून देऊ शकतो. आई, बहीण किंवा पत्नीला तिला हव्या त्या ग्रुपसोबत ट्रिपला पाठवता येईल. किंवा एक दिवस स्वयंपाकाला सुटी देत तिला डिनरला बाहेर घेऊन जाता येईळ.

ऑफिस सहकाऱ्याला…

ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला सहकाऱ्याला गिफ्ट द्यायचे असेल तर उत्तम क्वालिटिची पाण्याची बाटली, कार्ड होल्डर, ईयरफोन, ब्लूटूथ स्पीकर, लॅपटॉप बॅग, पेन, सेल्फी स्टिक देता येईल.

उत्तम बॅग

शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीपासून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांना पर्स किंवा हँडबॅग ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. त्यांना उपयुक्त होईल अशी बॅग दिल्यास महिलांसाठी हे उत्तम गिफ्ट ठरू शकतं.

सेफ्टी अॅप किंवा उपकरण

आंतराराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना त्यांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरतील, असे अॅप गिफ्ट देता येतील. किंवा तसे गॅझेटही भेट म्हणून देता येतील

किचन अप्लायंसेस

महिला दिनानिमित्त काही इलेक्ट्रॉनिक वस्तू, घराच्या सजावटीसाठी उपयुक्त साहित्य देता येईल. तुम्ही ज्वेलरी, साडी, पुस्तके किंवा जुन्या छायाचित्रांचं कोलाजदेखील तयार करून देऊ शकता.

मेकअप गिफ्ट वाउचर

महिला दिनाला महिलांसाठी काही गिफ्ट वाउचर, मेकअप किट, ब्युटी प्रॉडक्ट्स, गॅझेट्स किंवा एखाद्या ट्रिपचा प्लॅन बनवून देऊ शकता. आईला, बहिण, पत्नी, मैत्रिणीला लाँग ड्राइव्ह किंवा डिनरसाठीही नेता येईल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.