आयएएस अधिकारी देशाचा कणा, सदगुरुंकडून कौतुकाची थाप

या ग्रहावर एकच समस्या आहे - ती मानवाची. यावरचा एकमेव उपाय म्हणजे माणसाला द्विस्तरीय काम आणि अनुभवासाठी प्रोत्साहित करणे, असं सद्गुरू म्हणाले (Isha Foundation Founder Sadhguru talks with top IAS officers calls them Spine of Nation)

आयएएस अधिकारी देशाचा कणा, सदगुरुंकडून कौतुकाची थाप
Follow us
| Updated on: Jun 01, 2020 | 11:42 AM

मुंबई : प्रशासकीय अधिकारी हे राष्ट्राचा कणा आहेत, अशा शब्दात ‘ईशा फाउंडेशन’चे संस्थापक सदगुरु यांनी आयएएस अधिकाऱ्यांची पाठ थोपटली. ‘सिव्हिल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर असोसिएशन’ला दिलेल्या 90 मिनिटांच्या मुलाखतीत सदगुरु यांनी प्रशासकीय कार्यक्षमता आणि त्याचा प्रभाव सुधारण्यासाठी प्रशासन आणि प्रशासकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे आवाहन केले. आपल्या 25 ते 30 वर्षांच्या कारकीर्दीत प्रशासकीय अधिकारी नेत्यांपेक्षा चांगली भूमिका बजावून देशात बदल घडवून आणू शकता, असा विश्वास त्यांनी निर्माण केला. (Isha Foundation Founder Sadhguru talks with top IAS officers calls them Spine of Nation)

प्रशासकीय अधिकारी हे राष्ट्राचा कणा असल्याचे वर्णन सदगुरु यांनी केले. “या कठीण काळात आयएएस अधिकाऱ्यांच्या नव्या पिढीला प्रेरित करण्याची गरज आहे. कारण येत्या पाच वर्षांत आपण जे काही करु, त्याचा परिणाम येत्या शतकावर होईल” असं ते म्हणाले

डॉ. संजीव चोप्रा यांनी सदगुरु यांची ओळख करुन देत मुलाखत सुरु केली. ‘सिव्हिल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर असोसिएशन’ ही सर्वात जुन्या नागरी सेवा संस्थांपैकी एक असल्याचं चोप्रा यांनी सांगितलं. त्यांनी सदगुरु यांना विचारले की अधिकारी “योगः कर्मसु कौशलम्” हे आयएएस सेवेचे आदर्श वाक्य कसे आत्मसात शकतात.

या प्रश्नाला उत्तर देताना सदगुरु म्हणाले की, “योग शब्दाचा अर्थ ‘संघ’ असा आहे. आपण आपल्या वैयक्तिक स्वभावाला फार गांभीर्याने घेतले नसेल, तर आपण स्वाभाविकच योगामध्ये आहात. जेव्हा आपण निसर्गाशी तादात्म्य व्हाल तेव्हाच संघ शक्य आहे. जर आपण निसर्गाशी पूर्णपणे एकरुप होऊन काम केले, तर आपण उत्कृष्ट कार्य करु शकता.”

तुम्ही फक्त कायद्याचे पालनकर्ते

सदगुरु म्हणाले की, “नागरी प्रशासक म्हणून तुम्ही फक्त कायद्याचे अनुसरण करुन घेत आहात. आपली माणुसकी ही वेगळी गोष्ट आहे, परंतु आपण केवळ मानवतेला कायद्याच्या कक्षेत आणू शकता. जर कायदा कमकुवत झाला, तर आपल्याकडे कोणताही पर्याय नसेल, असं ते म्हणाले.

सदगुरुनी अस्पष्ट, जुने कायदे बदलण्याची किंवा रद्द करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “ब्रिटीशांनी स्वत:ला यशस्वी करण्यासाठी कायदे केले. कायदे जनतेसाठी नसून प्रशासकांना त्यांना नियंत्रित करता यावे, यासाठी बनवले गेले. सामान्यत: भारतीय नागरिकांना सरकारी कार्यालये आणि कायदेशीर प्रणालींशी संपर्क साधणे अत्यंत अवघड वाटते. कारण एजंटच्या मध्यस्थीमुळे भ्रष्टाचार आणि औदासीन्य निर्माण झाले आहे.”

सदगुरुनी देशाचा प्राचीन आणि समृद्ध वारसा स्वीकारण्याच्या महत्वाकांक्षेबद्दल सविस्तरपणे सांगितले. ते म्हणाले की “800-900 वर्षांचे क्रूर हल्ले आणि सुमारे 250 वर्षे ब्रिटीशांच्या राजवटीचा इतिहास असूनही आपला वारसा टिकून आहे. लोकतंत्र सर्व आयामांनी आणि खोलवर कोणी पहिले असेल तर, ते आपल्या संस्कृतीने” असं सदगुरु म्हणाले.

“या ग्रहावर एकच समस्या आहे – ती मानवाची. यावरचा एकमेव उपाय म्हणजे माणसाला द्विस्तरीय काम आणि अनुभवासाठी प्रोत्साहित करणे. जर मनुष्याने अधिक चांगले विचार केले, अनुभवले आणि नंतर त्यानुसार आचरण केले, तर तो सर्वात मोठा तोडगा ठरेल. सध्या मानवाची विचार करण्याची, अनुभवण्याची आणि वागण्याची पद्धत ही एक मोठी समस्या आहे.” असं सदगुरु म्हणाले.

पाहा व्हिडीओ:

(Isha Foundation Founder Sadhguru talks with top IAS officers calls them Spine of Nation)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.