Beauty Tips : फळांची साल त्वचेसाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

फळांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सहसा आपण सर्व फळे सोलून खातो.

Beauty Tips : फळांची साल त्वचेसाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

मुंबई : फळांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सहसा आपण सर्व फळे सोलून खातो. त्यानंतर फळाचे साल फेकून देतो. मात्र, फळांच्या साल आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. फळाची साले आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचेला चमक देण्याचे काम करतात. चला तर जाणून घेऊयात फळांच्या सालीचे फायदे (It is beneficial to apply the peel on the face)

पपईची साल – पपईची साल चेहऱ्याचा कोरडपणा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. सर्वात अगोदर पपईची साल वाळवावी आणि त्याची बारीक पावडर करा. दोन चमचे पपईच्या पावडरमध्ये एक चमचे ग्लिसरीन घाला आणि फेसपॅक चेहर्‍यावर लावा. फेसपॅक कोरडा झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहर्‍यावर टॅनिंगची समस्या असल्यास ताज्या पपईची साल बारीक करून त्यात लिंबाचा रस मिसळा.

संत्र्याची साल – संत्रीची साल सुकवून घ्या आणि त्याचे पावडर तयार करा या पावडरमध्ये मध आणि दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. थोडया हलक्या हातांनी मसाज करा, कारण फेसमास्कबरोबरच हे चांगले स्क्रब आहे. मसाज केल्यानंतर ते कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने तोंड धुवा. संत्री हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानला जातो.

खरबूजची साल –खरबूज लगदा वेगळा केल्यानंतर फळाची साल फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि काॅटनच्या कपड्याने गाळा आणि हे एका बाॅटलमध्ये ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला असे वाटते की त्वचा खराब होत आहे तेव्हा लगेच हे चेहऱ्याला लावा.

केळीचे साल – केळीचे साल चेहर्‍यावरील डाग काढते. केळीच्या सालाची पेस्ट बनवण्याची गरज नाही. केळीची साल चेहऱ्यावर घासून घ्या आणि कोरडे झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. केळीमध्ये वंगण घालणारी नैसर्गिक चरबी आणि प्रथिने असतात ज्या आपल्या त्वचेला मऊ ठेवण्यासाठी आवश्यक असतात.

आंब्याचे साल – आंब्याच्या सालाचे थोडेसे पीठ करून घ्या त्याची पेस्ट तयार करा त्यात मध मिसळा आणि गळ्यापासून तोंडावर लावा. कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. आंब्यामध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे त्वचेवर बॅक्टेरियाच्या बुरशीपासून बचाव करतात तसेच वृद्धत्वाचे परिणाम कमी करतात.

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(It is beneficial to apply the peel on the face)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI