हिवाळ्यात कोरडेपणामुळे सतत अंगाला खाज सुटतेय? करा हे घरगुती उपाय लगेच मिळेल आराम

अंगाला सतत खाज सुटत असल्यास ते अतिशय त्रासदायक असते. पण असे काही घरगुती उपाय आहेत ज्यामुळे तुम्ही या खाजेपासून नक्कीच आराम मिळवू शकता. हे घरगुती उपाय अगदी सोपे असून तुम्ही ते नक्कीच ट्राय करू शकता.

हिवाळ्यात कोरडेपणामुळे सतत अंगाला खाज सुटतेय? करा हे घरगुती उपाय लगेच मिळेल आराम
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 2:44 PM

उन्हाळ्यात घामामुळे खाज सुटते तसंच हिवाळ्यातही त्वचा कोरडी पडल्यामुळेहा खाज सुटतेच. त्वचेला खाज येणे ही अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. आपण जितके खाजवू तितकी ती जास्तप्रमाणात वाढते. अतिप्रमाणात खाजवल्यास त्वचेचा संसर्ग होण्याचा धोका असतो. यासाठी सुरुवातीला घरगुती उपाय करून पाहणे नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

पाहुयात घरगुती उपाय कोणते आहेत ते

1) खोबरेल तेल कधी त्वचेच्या कोरडेरपणामुळे तर कधी कीटकाच्या दंशामुळे शरीराला  खाज येण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यावर खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर  संपूर्ण शरीरावर खोबरेल तेल लावणे नक्कीच चांगले.

2) पेट्रोलियम जेली जर तुमची त्वचा खुपच संवेदनशील असेल आणि कोणतीही मॉइश्चराईजर तुमला सुटच होत नसेल तर सरळ पेट्रोलियम जेली लावा. त्याचा फारच उपयोग होईल. पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचा मऊ राहण्यास मदत होते. त्यामुळे खाज कमी होऊन त्वचेचा लालसरपणाही कमी होतो.

3) लिंबू व्हिटामिन सी’ने युक्त  लिंबात ब्लिचिंग क्षमतादेखील असल्याने त्वचेची खाज कमी होण्यास  मदत होते. तसेच लिंबामुळे त्वचेत होणारी दाहकता कमी होते. त्वचेच्या ज्या भागावर  खाज सुटते तेथे लिंबाच्या रसाचे काही थेंब टाकल्यास. हे थेंब सुकू द्या. काहीवेळाने तुम्हाला त्रास कमी होत असल्याचे जाणवेल. कदाचित सतत खाज सुटत असल्याने लिंबाचे थेंब टाकल्याने काही सेकंद हलकीशी जळजळ होईल पण नंतर शांत होईल. हा उपाय करून झाल्यानंतर खोबरेल तेल किंवा पेट्रोलियम जेली लावायला विसरू नका.

4) बेकिंग सोडा शरीराच्या लहानशा भागावर येणार्‍या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा फारच उपयुक्त आहे. तीन लहान चमचे सोडा घेतला तर त्यात थोडे पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करा व  खाज येणार्‍या भागावर लावा. मात्र त्वचेवर चिर गेली असल्यास किंवा  जखम असल्यास हा उपाय करू नका नाहीतर त्रास होऊ शकतो. शरीरभर खाज सुटत असेल तर कपभर सोडा ,कोमट पाण्याच्या बाथटब मध्ये टाकून आंघोळ करा.

5) तुळस तुळशीतील औषधी गुणधर्म शरीरावरील खाज कमी करण्यास मदत  करतात. तुळशीची पानं त्वचेवर खाज येत असलेल्या भागावर चोळा. किंवा  पाण्यात काही तुळशीची पाने टाकून काढा बनवा. त्या पाण्यात कापसचा बोळा किंवा कपडा बुडवून तो खाज येत असलेल्या भागावर लावा. त्यामुळे तेथील जंतू मरण्यास मदत होईल आणि खाजही कमी होईल

6) कोरफड कोरफडातील औषधी गुणधर्म देखील त्वचेला थंडावा देण्यास मदत करतात. कोरफडातील गर खाज येत असलेल्या भागावर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल.

शरीराला खाज सुटत असल्यास खाजवून त्वचेची हानी करण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करा. मात्र वेळीच आराम न मिळाल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कारण काहा वेळेला कपड्याची, अन्नपदार्थांची किंवा पाण्याची, धुळीची अ‍ॅलर्जी असू शकते असल्यास खाज सुटू शकते.त्यामुळे शरीरावर खाज येण्याचे कारण माहित करून घेणे महत्त्वाचे असते. त्याचे योग्य निदान झाल्यास योग्य ते उपचार तुम्हाला मिळतील. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे म्हत्त्वाचे आहे.

'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल
'असं का ओरडला नाहीत?', मुंडेंच्या पहाटेच्या शपथविधीनंतर राऊतांचा सवाल.
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा
भाजपात येण्यासाठी काँग्रेसचा नेता फडणवीसांना भेटला? सामंतांचा दावा.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी अपडेट, कोर्टानं 5 पोलिसांनाच धरल जबाबदार.
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं
'हा बालिशपणा, मी भीक घालत नाही', सामंतांनी राऊत-वडेट्टीवारांना फटकारलं.
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'
बीडच्या पालकमंत्रीपदावरून पंकजा मुंडे म्हणाल्या, '..तर आंनद झाला असता'.
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला
'शिंदे अस्वस्थ आत्मा, दरेवालाबाबा त्यांनी कुंभमेळ्यात..',राऊतांचा टोला.
"मला भिती वाटते माझं वक्तव्य मोठं...ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं आता"
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.