AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

उष्णता वाढू लागला आहे अनेकजण या उष्णतेपासून सुटका मिळावी म्हणून उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अशातच या उन्हाळ्यात प्रवासादरम्यान आजारी पडू नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

उन्हाळी सुट्टीत प्रवास करताना आजारी पडू नये यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी
summer travelImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 3:10 PM
Share

उन्हाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो. त्यामुळे बदलत्या वातावरणाचा परिणाम हा अनेकांच्या आरोग्यावर होत असतो. अशातच उन्हाळा सुरू झाला की मुलांना शाळेच्या सुट्टया सुरू होतात. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण सुट्टयांमध्ये बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. मात्र या प्रवासादरम्यान एखादी व्यक्ती आजारी पडल्यास संपूर्ण ट्रिप खराब होऊ शकते. त्यामुळे प्रवास करताना काही लहान गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. लोक उन्हाळ्यात थंड ठिकाणी भेट देण्यास प्राधान्य देतात आणि एप्रिलपासूनच त्यांच्या ट्रिपचे नियोजन सुरू करतात.

उन्हाळ्यात प्रवास केल्याने उष्माघात आणि डिहायड्रेशन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे डोकेदुखी आणि पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तर कडक उन्हाळ्यात प्रवासादरम्यान चक्कर येणे, डोकेदुखी, पचनाच्या समस्या आणि मळमळ व उलट्या या काही सर्वात सामान्य आरोग्य समस्या सतावण्याची शक्यता असते. जर तुम्हाला प्रवासादरम्यान निरोगी राहायचे असेल आणि तुमच्या आवडीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सक्रिय राहायचे असेल, तर आजच्या लेखात आपण या काही टिप्स कशा उपयुक्त ठरू शकतात ते जाणून घेऊयात.

शरीरातील पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या

जर तुम्ही प्रवासाला जात असाल, तर उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्याची खात्री करा. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही जे पाणी पिता ते स्वच्छ असल्याची खात्री करा. कारण अनेकदा प्रवासात प्रत्येकजण पाण्याची बाटली विकत घेतो ते पाणी स्वच्छ आहे की नाही ही शंका येते, यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. भरपूर पाणी प्या आणि स्वच्छ पाणी प्या.

स्टाईलिंगची काळजी घ्या

प्रवास करताना सैल आणि आरामदायक कपडे परिधान करा. हलक्या रंगाचे कपडे निवडा. तसेच बाहेर जावे लागल्यास सनग्लासेस आणि टोपी नक्की घाला. यामुळे तुमच्या डोळ्यांचे आणि डोक्याचे थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण होते. प्रवासात बूटसुद्धा आरामदायक असावेत.

जेवणाची काळजी घ्या

प्रवासात असताना तुम्ही जे काही खाल ते हलके आणि सहज पचणारे असेल याची खात्री करा. बाहेरचे अन्न विकत घेणे टाळा. घरातून असे काही खाद्यपदार्थ आणा जे लवकर खराब होत नाहीत. तुम्ही काही फळांचा आहार देखील करू शकता. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी, काकडी, मुळा, संत्री आणि लिंबू यांसारखे पाण्याने भरपूर असलेले पदार्थ खाणे महत्त्वाचे आहे.

औषधे जवळ ठेवणे

बऱ्याचदा सर्व खबरदारी घेऊनही थकवा आजारपणास कारणीभूत ठरू शकतो. परिस्थितीवर वेळेवर उपाय करण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि काही मूलभूत औषधे सोबत बाळगणे महत्त्वाचे आहे. यामध्ये ताप, मळमळ, उलटी, जुलाब यासाठीच्या गोळ्या आणि वेदनाशामक औषधांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त किरकोळ जखमांसाठी वेदनाशामक मलम आणि जखमांसाठी ट्यूब व पट्टी सोबत बाळगावी.

तुमच्या त्वचेचीही काळजी घ्या

कधीकधी प्रवासादरम्यान आपली त्वचा इतकी निस्तेज होते की आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. इतकेच नाही तर, त्वचेवर अनेकदा पुरळ उठते, जे खूप त्रासदायक ठरू शकते. ही समस्या टाळण्यासाठी तुमच्यासोबत अँटीसेप्टिक क्रीम, तसेच सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर ठेवावे.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.) —————————————————————— —————————————————————— ——————————————————————

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा