पोटावरील चरबीमुळे चिंतीत आहात? आता आयुर्वेदिक औषधी आणि मसाल्यांनी कमी करा वजन!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 10, 2021 | 8:57 AM

पोटाची चरबी कमी करणे हे काही सोपे काम नाहीये. विशेषत: जेव्हा कोविड -19 लॉकडाऊननंतर आपल्याला घरात राहण्याची आणि एकाच जागी बसून काम करण्याची सवय लागली असताना. मात्र, वाढलेले वजन कमी करणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

पोटावरील चरबीमुळे चिंतीत आहात? आता आयुर्वेदिक औषधी आणि मसाल्यांनी कमी करा वजन!
पोटावरची चरबी

मुंबई : पोटाची चरबी कमी करणे हे काही सोपे काम नाहीये. विशेषत: जेव्हा कोविड -19 लॉकडाऊननंतर आपल्याला घरात राहण्याची आणि एकाच जागी बसून काम करण्याची सवय लागली असताना. मात्र, वाढलेले वजन कमी करणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की पोटावरच्या चरबीमुळे हृदयविकाराचा धोकादायक अधिक वाढतो. (Ayurvedic medicine is beneficial for reducing belly fat)

म्हणून, वेळ वाया न घालवता आपल्या पोटावरची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करा. पण वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक मार्ग स्वीकारण्यास विसरू नका. उदाहरणार्थ, गरम पाणी प्यायल्याने पचन गतिमान होते आणि आहारात आले आणि काळी मिरी टाकल्याने वजन कमी होण्यास मदत होते. परंतु या व्यतिरिक्त स्वयंपाकघरातील इतर काही नैसर्गिक घटक आहेत, जे उपयुक्त ठरू शकतात.

काळे जिरे

काळे जिरे, ज्याला काळे बियाणे किंवा कालोंजी असेही म्हणतात, वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. विशेषत: पोटाची चरबी कमी करण्यासाठी. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी कलोंजी बियाणे आणि तेलाचे अर्क वापरले जातात.

त्रिफळा

आमला, बिभीतकी आणि हरीताकी या तीन कॉम्बाईन सुपरफूडसह तयार केलेली ही औषधी वनस्पती आहे. त्रिफळा टाइप -2 मधुमेहामुळे ग्रस्त लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. हे पाचन तंत्राचे डिटॉक्सिफिकेशन करून आणि बद्धकोष्ठतेशी लढून वजन कमी करण्यास मदत करते.

मेथी

मेथी, स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक, पचनसंस्थेला मदत करते. तसेच अन्नाची तल्लफ कमी करण्यास आणि भूक कमी करण्यास मदत होते.

पुनर्नवा

पुनर्नवा याला बोरहविया डिफुसा असेही म्हणतात, एक फुलांची वनस्पती आहे जी वजन कमी करण्याच्या प्रभावी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. त्यात मूत्रवर्धक घटक असतात जे मूत्रपिंड आणि मूत्र यावर अधिक चांगले प्रक्रिया करण्यास मदत करतात. हे आवश्यक खनिजांचे नुकसान न करता शरीरातून विष काढून टाकण्यास मदत करते.

दालचिनी

दालचिनी चयापचय उत्तेजित करण्यासाठी ओळखली जाते. जी अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत करते.

संबंधित बातम्या : 

Health Tips | कामाच्या निमित्ताने सतत घराबाहेर राहावं लागतंय? मग, निरोगी राहण्यासाठी ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Ayurvedic medicine is beneficial for reducing belly fat)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI