AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबी थंडीत ‘या’ फळांचे सेवन करा, हेल्दी डाएट जाणून घ्या

Fruits Combination: हिवाळ्यातील थंडीत तुम्हाला फळे कोणती फळे खावे, हे कळत नसेल तर ही बातमी नक्की वाचा. थंड हवामानात आम्ही सांगत असलेल्या काही फळांचे कॉम्बिनेशन खाण्यास सुरुवात करा, यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही. आता असे कोणते आरोग्यदायी फळे आहेत, याविषयी खाली विस्ताराने जाणून घेऊया.

गुलाबी थंडीत ‘या’ फळांचे सेवन करा, हेल्दी डाएट जाणून घ्या
गुलाबी थंडीत ‘या’ फळांचे सेवन करा, हेल्दी डाएट जाणून घ्या
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 3:10 PM
Share

Fruits Combination: हिवाळ्यात थंडी असल्याने अशा वातावरणात नेमकं काय खावं, हे कळत नाही. पण, यावर आज आम्ही तुम्हाला फळांचा डाएट सांगणार आहोत. आम्ही तज्ज्ञांच्या सल्लाने खाली सांगितलेली फळे तुम्ही खाल्ल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, याने तुम्ही आजारी पडणार नाही. जाणून घेऊया.

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणाऱ्यांनी हिवाळ्यात अधिक काळजी घेण्याची गरज असते. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना थंड हवामानात अनेकदा खोकला, सर्दी, व्हायरल इन्फेक्शन आणि पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी हेल्दी डाएटसोबतच फळांनाही डाएटचा भाग बनवा.

व्हिटॅमिन A, B12 आणि C आवश्यक

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या चीफ डायटीशियन प्रिया पालीवाल सांगतात की, हिवाळ्यात निरोगी आणि पौष्टिक फळांचे योग्य संयोजन आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. ते खाल्ल्याने तुम्हाला व्हिटॅमिन A, B 12 आणि C मिळेल. हे तुमचं शरीर तंदुरुस्त ठेवतील.

कोणती फळे खावी?

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शरीर उबदार ठेवण्यासाठी व्हिटॅमिन C, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स युक्त फळांचा आहारात समावेश करा. एक उत्तम पर्याय म्हणजे संत्रा आणि डाळिंबाचे कॉम्बिनेशन. संत्रीमध्ये व्हिटॅमिन C आणि डाळिंब अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते. ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि थंडीशी लढण्यास मदत करतात.

सफरचंद आणि नाशपाती (Pear) एकत्र खाऊ शकता. ही दोन्ही फळे फायबरने समृद्ध असून पचनक्रिया योग्य ठेवण्याबरोबरच शरीराला आतून उबदार ठेवतात. नाशपातीमध्ये व्हिटॅमिन C देखील मुबलक प्रमाणात असते.

पेरू आणि किवी यांचे मिश्रण

याशिवाय हिवाळ्यात पेरू आणि किवीचे कॉम्बिनेशन देखील खूप फायदेशीर ठरते. पेरू व्हिटॅमिन C चा उत्कृष्ट स्त्रोत आहे, तर किवीमध्ये असलेले व्हिटॅमिन E आणि पोटॅशियम आपल्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते. ऊर्जा हवी असेल तर केळी आणि पपई हा चांगला पर्याय आहे. ही दोन्ही फळे पचायला सोपी असून शरीराला झटपट ऊर्जा देतात.

ड्राय फ्रूट असलेले फळ

खजूर किंवा अंजीर सारख्या ड्रायफ्रूट्समध्ये ताजी फळे मिसळणे देखील हिवाळ्यात खूप फायदेशीर ठरू शकते. एकंदरीत, ताज्या आणि हंगामी फळांचे योग्य संयोजन हिवाळ्यात आपली प्रतिकारशक्ती तर वाढवेलच, शिवाय सर्दी आणि थकव्यापासूनही तुमचे रक्षण करेल. ताजी आणि हंगामी फळेच खाण्याचा प्रयत्न करा आणि फळे जास्त थंड खाऊ नका.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.