Health Tips : ब्राऊन शुगर वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Jul 27, 2021 | 11:03 AM

ब्राऊन शुगर हा साखरेचा एक प्रकार आहे. ब्राऊन शुगरचा रंग तपकिरी असतो. ब्राऊन शुगर नैसर्गिकरित्या बनविली जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि शुगर आहे, असा लोकांसाठी ब्राऊन शुगर अत्यंत फायदेशीर आहे.

Health Tips : ब्राऊन शुगर वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
ब्राऊन शुगर

मुंबई : ब्राऊन शुगर हा साखरेचा एक प्रकार आहे. ब्राऊन शुगरचा रंग तपकिरी असतो. ब्राऊन शुगर नैसर्गिकरित्या बनविली जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि शुगर आहे, असा लोकांसाठी ब्राऊन शुगर अत्यंत फायदेशीर आहे. या ब्राऊन शुगरमध्ये कॅलरीचे खूप कमी प्रमाण आणि त्यात बरेच पौष्टिक घटक आहेत. यामुळे पांढऱ्या साखरेपेक्षाही अधिक आरोग्यासाठी ब्राऊन शुगर फायदेशीर आहे. (Brown sugar is beneficial for weight loss)

पोटासाठी फायदेशीर- ब्राऊन शुगर पोटातील समस्यांपासून आराम देते. आपल्याला बद्धकोष्ठता, अपचनाची समस्या असल्यास आपण आहारात ब्राऊन शुगर वापरली पाहिजे.

वजन कमी करण्यास मदत करते – जास्त प्रमाणात साखर सेवन करणे आरोग्यास हानिकारक आहे. त्याऐवजी आपण ब्राऊन शुगर वापरू शकता. ब्राऊन शुगरमध्ये कॅलरी कमी असते. ज्यामुळे चयापचय वाढविण्यास मदत होते. याशिवाय ब्राऊन शुगरमुळे आपल्याला बराचवेळ भूक देखील लागत नाही.

त्वचेसाठी फायदेशीर – ब्राऊन शुगर त्वचेतील एक्फोलीएटर म्हणून कार्य करते. जे त्वचेतील घाण आणि मृत पेशी काढून टाकण्यासाठी कार्य करते. विशेष म्हणजे ब्राऊन शुगरचे अनेक फेसपॅक देखील घरच्या घरी तयार करता येतात.

पीरियडमधील वेदना कमी करते – महिलांना पीरियडमध्ये क्रॅम्प्समधून जावे लागते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण ब्राऊन शुगर वापरू शकता. यात पोटॅशियम असते जे स्नायूचा वेदना दूर करण्यास मदत करते.

पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी – ब्राउन शुगर पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे. हे पोटा संबंधित अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यात मदत करते. पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी, आपण एक ग्लास कोमट पाण्यात ब्राउन शुगर मिक्स करून प्यावी.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Brown sugar is beneficial for weight loss)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI