Diwali Recipes | या दिवाळीत जेवणामध्ये ट्राय करा काजू मखाण्याची हेल्दी भाजी

या दिवाळीत तुम्हाला वेगळ्या प्रकारची भाजी बनवायची असेल, तर काजू मखनाची हेल्दी भाजी तुम्ही नक्की ट्राय करु शकता. दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी अनेक मिठाई आणि विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. पण कधी कधी दिवाळीत काहीतरी वेगळे आणि नवीन करून बघायला आवडते. जे काही पदार्थ बनवले जातात ते हेल्दी असावेत, अशा स्थितीत माखणा आणि काजू हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी पोषक असतात. अशा वेळी या सणाला माखणाची ही रेसिपी नक्की करून पहा.

Diwali Recipes | या दिवाळीत जेवणामध्ये ट्राय करा काजू मखाण्याची हेल्दी भाजी
makahana-

मुंबई : या दिवाळीत तुम्हाला वेगळ्या प्रकारची भाजी बनवायची असेल, तर काजू मखनाची हेल्दी भाजी तुम्ही नक्की ट्राय करु शकता. दिवाळीच्या निमित्ताने घरोघरी अनेक मिठाई आणि विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. पण कधी कधी दिवाळीत काहीतरी वेगळे आणि नवीन करून बघायला आवडते. जे काही पदार्थ बनवले जातात ते हेल्दी असावेत, अशा स्थितीत माखणा आणि काजू हे दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी पोषक असतात. अशा वेळी या सणाला माखणाची ही रेसिपी नक्की करून पहा. मखना आणि काजूची ही भाजी चविष्ट तर असतेच पण आरोग्यासाठीही फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या दिवाळीत तुम्ही कसा बनवणार स्पेशल काजू मखना.

काजू मखाना सब्जी बनवण्यासाठी साहित्य
मखाना – 1 कप
काजू – 20-25
तेल – काजू मखाना तळण्यासाठी

ग्रेव्हीचे साहित्य
टोमॅटो – 4
हिरव्या मिरच्या – 2
काजू – 25 काजू (पाण्यात भिजवलेले)
कोथिंबीर – बारीक चिरलेली
तेल – 2 टीस्पून
आले पेस्ट – 1 टीस्पून
कसुरी मेथी – 1 टीस्पून
हिंग – 1 चिमूटभर
जिरे – टीस्पून
गरम मसाला – 1/4 टीस्पून
हळदी पावडर – 1/4 टीस्पून
लाल मिर्च – 1/4 टीस्पून
धने पावडर – 1 टीस्पून
मिठ- चवीनुसार

काजू मखनाची भाजीची कृती
ही भाजी बनवण्यासाठी प्रथम टोमॅटो चांगले धुवून नंतर त्याचे मोठे तुकडे करून घ्या, त्यानंतर हिरव्या मिरचीचा देठ काढून धुवा. टोमॅटो हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या. भिजवलेले काजूही बारीक वाटून घ्या.या भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी मसाले तळून घ्या, तेल गरम झाल्यावर एका कढईत जिरे टाका, जिरे भाजून झाल्यावर हिंग घाला, आले पेस्ट, हळद, कसुरी मेथी आणि धने पावडर घाला आणि मसाले चांगले मिक्स करा. मसाला चांगला शिजू द्या मसाला तेल सोडून तरंगायला लागेपर्यंत तळून घ्या. यानंतर भाजलेल्या मसाल्यामध्ये १ वाटी पाणी टाकून त्यात चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि थोडी हिरवी कोथिंबीर घालून मिक्स करा. ग्रेव्हीला उकळी आल्यावर त्यात भाजलेले मखणा आणि काजू घाला, भाजी झाकून ठेवा आणि मंद गॅसवर ३-४ मिनिटे शिजू द्या. मखाना काजू करी भाजी या सोप्या पद्धतीने तयार होईल, जी खूप चांगली भाजी होईल. भाजी शिजल्यानंतर एका भांड्यात काढून त्यावर हिरवी धणे किंवा मलई घालून भाजी सजवा. ही भाजी तुम्ही रोटी आणि भातासोबत खाऊ शकता.

मखान्याचे फायदे
मखाना हे एक पौष्टिक आणि अनेक प्राक्रुतिक व औषधी गुणधर्माने युक्त असे कमळाचे बीज आहे. भरपूर प्रोटिन, कार्बोहायड्रेट, मँग्नेशिअम, फॉस्फरस, व पोटॅशिअमने युक्त असे मखाना आहे. मखाना हे हृदय व किडनिला हेल्दी ठेवतात. मधुमेहावर जर तुम्ही रोज चारच मखाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर डायबेटिस कमी होतो.उच्च रक्तदाबावर देखील नियंत्रण येते मानसिक ताण, राग येणे यावर अंकूश येतो याच्या सेवनाने कारण हे कमळापासून तयार झालेले थंड प्रक्रुतीचे बीज आहे. चेहरा तजेलदार होतो याच्या सेवनाने, कारण यात व्हिटॅमीन मुबलक प्रमाणात असते.यामुळे चेहऱ्यावरील सुरकूत्या गायब होण्यास मदत होते.

इतर बातम्या:

बाजारात मिळणाऱ्या उटण्याचा कंटाळा आलाय? , घरच्या घरी बनणारे 4 उटण्याचे प्रकार नक्की ट्राय करा

Weight Loss Tips | जिम, डायट सर्व करूनही वजन कमी होत नाहीये? हे 5 सुपर ड्रिंक नक्की ट्राय करून पाहा

सावधान! चहा, नाश्ता एकत्र करताय? अनेक आजारांना निमंत्रण देताय

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI