AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज सकाळी दोन चमचे भिजवलेले मनुके खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी!

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. द्राक्ष सुकवून मनुके तयार केली जातात.

दररोज सकाळी दोन चमचे भिजवलेले मनुके खाणे आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी!
मनुके
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 08, 2021 | 9:07 AM
Share

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. द्राक्ष सुकवून मनुके तयार केली जातात. मनुक्यामध्ये विविध प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिज आढळतात, जे आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आहेत. मनुक्याचे पाणी पिण्यामुळे आपल्या शरीरास बर्‍याच फायद्यांसह ऊर्जा देखील मिळते. (Eating raisins soaked in water is beneficial for health)

मनुक्याचे पाणी हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात खूप उपयुक्त आहे. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, दररोज सकाळी उपाशी पोटी रात्री पाण्यात भिजवलेले मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत. यामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. यासाठी रात्री झोपण्याच्या अगोदर दोन चमचे मनुके पाण्यात भिजवा आणि सकाळी त्या मनुक्यातील पाणी काढा आणि हे मनुके खा.

यामुळे आपले वजन कमी होण्यास आणि बद्धकोष्ठताची समस्या दूर होण्यास मदत होईल. मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि तांबे मोठ्या प्रमाणात असते. दोन्ही घटक रक्त वाढविण्यात मदत करतात. अशा परिस्थितीत, अशक्तपणा असलेल्या रुग्णांनी मनुक्याचे सेवन जास्तीत-जास्त प्रमाणात केले पाहिजे. हाडे देखील कमकुवत होऊ लागतात आणि हे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होते. मनुक्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते, तसेच बोरॉन नावाचे एक घटक आहे.

जे हाडांमध्ये कॅल्शियम वाहतूक करण्यासाठी कार्य करते. जर तुम्हाला तुमची हाडे दीर्घकाळ मजबूत ठेवायची असतील तर दररोज मनुके खा. महिलांनी कोणत्याही परिस्थितीत मनुके खावीत. आपल्या शरीरातून खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकून हृदयाच्या आरोग्यास सुधारते. जर सकाळी रिकाम्या पोटी मनुकाचे पाणी पिल्यामुळे आपले वजन देखील कमी करते. यात भरपूर फ्रुक्टोज आणि ग्लूकोज असतात, जे आपल्या शरीरातील ऊर्जा गमावू देत नाहीत. त्यामध्ये फायबर देखील असते, ज्याने आपले पोट भरते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Eating raisins soaked in water is beneficial for health)

Follow Us
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं