Tulsi-haldi kadha : पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस-हळदीचा काढा प्या!

पावसाळा अनेक रोगजंतू आणि रोग घेऊन येतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या हंगामात आजारी पडण्याचा सर्वाधिक धोका असतो. आपल्या दैनंदिन आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करावा आणि या हंगामात बाहेरचे अन्न टाळावे.

Tulsi-haldi kadha : पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुळस-हळदीचा काढा प्या!
काढा

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट भारतामध्ये आता ओसरत आली आहे. या कोरोनाच्या काळात प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर दिला. पावसाळा अनेक रोगजंतू आणि रोग घेऊन येतो. कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना या हंगामात आजारी पडण्याचा सर्वाधिक धोका असतो. आपल्या दैनंदिन आहारात निरोगी पदार्थांचा समावेश करावा आणि या हंगामात बाहेरचे अन्न टाळावे. हंगामी रोगांशी लढण्यासाठी सर्वात प्रभावी घटकांपैकी एक म्हणजे तुळस आणि हळदीचा काढा. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. (Extract of basil and turmeric is beneficial for boosting the immune system)

तुळस आणि हळदीचा काढा तयार करण्यासाठी साहित्य

-अर्धा चमचा हळद

-तुळशीची पाने-8-12

-मध – 2-3 चमचे

-लवंगा – 3-4

-दालचिनी -1

काढा कसा बनवायचा

एक पॅन घ्या आणि त्यात एक ग्लास पाणी घाला. आता त्यात हळद, तुळशीची पाने, लवंगा आणि दालचिनी घाला. मिश्रण 15 मिनिटे उकळू द्या. फिल्टर केलेले पाणी वापरण्याची खात्री करा. 15 मिनिटांनी पाणी गाळून घ्या आणि कोमट करा. चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे मध घालू शकता. रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि सर्दी आणि फ्लू बरा करण्यासाठी तुम्ही हा काढा एक ते दोन दिवस पिऊ शकता.

काढा तयार करण्यासाठी आपल्याला सात ते आठ तुळशीची पाने लागणार आहेत आणि गूळ लागणार आहे. एक ग्लास पाणी मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये गुळ आणि तुळशीची पाने मिक्स करा. दहा मिनिटे हे गरम करण्यासाठी ठेवा. एका ग्लासमध्ये हा काढा घ्या आणि गरम असतानाच प्या. हा काढा तयार करणे देखील खूप सोप्पे आहे. हा काढा दररोज आहारात घेतल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Extract of basil and turmeric is beneficial for boosting the immune system)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI