Weight Loss : डाएट न करता वजन कमी करायचे आहे? तर ‘या’ 5 खास टिप्स फॉलो करा!

लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वचजण घरामध्ये होतो. लॉकडाऊनमुळे अनेकांचे वजन वाढले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धती अवलंबतात. पण व्यस्त जीवनशैलीमुळे बरेच लोक कोणत्याही प्रकारचा डाएट फाॅलो करत नाहीत. ज्यामुळे वजन वाढतच जाते.

Weight Loss : डाएट न करता वजन कमी करायचे आहे? तर 'या' 5 खास टिप्स फॉलो करा!
लठ्ठपणा
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 10:30 AM

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आपण सर्वचजण घरामध्ये होतो. लॉकडाऊनमुळे अनेकांचे वजन वाढले आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धती अवलंबतात. पण व्यस्त जीवनशैलीमुळे बरेच लोक कोणत्याही प्रकारचा डाएट फाॅलो करत नाहीत. ज्यामुळे वजन वाढतच जाते. जर खरोखरच आपल्याला वाढलेले वजन कमी करायचे असेल तर आपण डाएट न करता देखील काही खास टिप्स फाॅलो करून आपले वाढलेले वजन कमी करू शकता. (Follow 5 tips to lose weight)

नाश्त्यामध्ये घ्या प्रथिनेयुक्त आहार

सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा. हे चयापचय प्रक्रियेसाठी फायदेशीर आहे. हे चयापचय दर वाढवते जे वजन कमी करण्यास मदत करते. तुम्ही तुमच्या आहारात चिकन ब्रेस्ट, लाइट ट्युना, सॅल्मन, अंडी, टोफू, सोया मिल्क, बीन्स, स्प्राउट्स, डाळी इत्यादी गोष्टींचा समावेश करू शकता.

बाहेरील पदार्थ खाणे टाळा

बऱ्याच वेळा आपल्याला कंटाळा आल्यानंतर आपण बाहेरील पदार्थ खातो. ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. आपल्याला भूक लागल्यानंतर आपण ग्रीन टी आणि हर्बल टी पिऊ शकता. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन असतात जे चयापचय वाढवण्यास मदत करतात. तसेच चरबी बर्न करतात. या पेयामध्ये दूध आणि साखर शक्यतो मिक्स करून नका.

अन्न चांगले चावा

अन्न नेहमीच चांगले चावले पाहिजे. अन्न पचवण्याची प्रक्रिया लाळेमध्ये आढळणाऱ्या एंजाइमपासून सुरू होते. असे केल्याने अन्न चांगले पचते. विशेष म्हणजे अन्न चांगले पचल्याने आपले पोटही लवकर भरते.

आहारात फायबरचा समावेश करा

आहारात फायबरयुक्त पदार्थांचा वापर करावा. यामुळे तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ते पचायलाही वेळ बराच वेळ लागतो. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ओट्सने करू शकता. कारण त्यात आवश्यक फायबर आणि पोषक घटक असतात.

आहारात मसाल्यांचा समावेश

मसाले केवळ चव वाढवत नाहीत तर ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात. जेव्हा आपण मसालेदार अन्न खातो, तेव्हा हळूहळू खा आणि जास्त पाणी प्या. मसालेदार अन्न तुमचे चयापचय वाढवते आणि काही काळ एड्रेनालाईन हार्मोन सोडते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow 5 tips to lose weight)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.