Weight Loss Tips : कुठल्याही प्रकारचे वर्कआउट न करता 5: 2 डाएट फॉर्मूला फाॅलो करा आणि झटपट वजन कमी करा!

जर तुम्हाला खरोखरच वजन कमी करायचे असेल तर तुम्ही 5: 2 डाएट फॉर्मूला फाॅलो केला पाहिजे. हा डाएट फॉर्मूला परदेशातही खूप प्रसिध्द आहे. यामध्ये आठवड्यातील पाच दिवस नीट खायचे. पण तुम्हाला दोन दिवस उपवास करावा लागतो. उपवासादरम्यान, आपल्याला फक्त 500 कॅलरीज लागतात.

Weight Loss Tips : कुठल्याही प्रकारचे वर्कआउट न करता 5: 2 डाएट फॉर्मूला फाॅलो करा आणि झटपट वजन कमी करा!
डाएट

मुंबई : लठ्ठपणामुळे जवळपास सर्वचजण त्रस्त आहेत. त्याचबरोबर हा लठ्ठपणा कमी करणे हे एक मोठे आव्हान आहे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी जीम, चालणे, पळणे, विविध व्यायामासोबतच डाएट देखील फाॅलो करतात. मात्र, हे सर्व करूनही वाढलेले वजन अनेकांचे कमी होत नाही. हे करूनही वजन वाढतेच. (Follow the 5: 2 diet formula and lose weight)

जर तुम्हाला खरोखरच वजन कमी करायचे असेल तर तुम्ही 5: 2 डाएट फॉर्मूला फाॅलो केला पाहिजे. हा डाएट फॉर्मूला परदेशातही खूप प्रसिध्द आहे. यामध्ये आठवड्यातील पाच दिवस नीट खायचे. पण तुम्हाला दोन दिवस उपवास करावा लागतो. उपवासादरम्यान, आपल्याला फक्त 500 कॅलरीज लागतात. असे म्हटले जाते की हा डाएट फॉर्मूला वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे हे सिद्ध देखील झाले आहे.

लोकांना हा डाएट फॉर्मूला आवडण्याचे कारण

साधारणपणे कोणत्याही डाएटिंग प्लॅनमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी खाण्यास मनाई असते. पण या डाएटमध्ये असे काहीही नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 5 दिवस तुम्हाला आवडेल ते खाऊ शकता. पण उपवासाच्या दिवशी तुम्हाला तज्ञांनी सांगितलेला आहार घ्यावा लागतो. साधारणपणे, आवश्यक अन्नपदार्थाच्या फक्त 25 टक्के खाण्याचा सल्ला दिला जातो. एकूणच, आहार आणि उपास यांच्यात एक चांगला समतोल तयार केला जातो, म्हणून हा डाएट प्लॅन लोकांना खूप आवडते.

आपल्या वेळेनुसार नियोजन करा

आपण आपल्या नियोजनाने आठवड्यातून दोन दिवस उपवास व्यवस्थापित करू शकता. जर तुम्हाला सतत दोन दिवस उपवास ठेवायचा असेल किंवा तुम्ही दोन दिवस आहार सांभाळू शकता आणि एक दिवस उपवास करू शकता, अशा प्रकारे देखील करू शकता. या व्यतिरिक्त, आपण ते 4: 3 किंवा 6: 1 सूत्रात रूपांतरित करू शकता. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार एकदाच तज्ञाशी बोलावे लागेल.

हे महत्वाचे फायदे

या डाएट प्लॅनमध्ये आपल्या शरीरात कॅलरीजचे व्यवस्थापन केले जाते. ज्यामुळे तुमचे वजन कमी होते. याशिवाय, दोन दिवस उपवास केल्याने तुमचे शरीर डिटॉक्सिफाइड होते. शरीरातून विषारी घटक काढून टाकल्याने केवळ शरीरच नाही तर तुमची त्वचाही निरोगी होते. या डाएट प्लॅनचे श्रेय ब्रिटिश लेखक कॅट हॅरिसन यांना जाते. डाएट प्लॅनद्वारे त्यांनी आपले वजन कमी केल्यानंतर या डाएट प्लॅनला त्यांनी 5: 2 असे नाव दिले आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

(Follow the 5: 2 diet formula and lose weight)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI