AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home remedies for Acidity : ‘हे’ पदार्थ ज्याने लगेच थांबेल अ‍ॅसिडिटीची समस्या, वाचा !

अ‍ॅसिडिटीची समस्या खूप सामान्य झाली आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना अ‍ॅसिडिटीची समस्या होत आहे.

Home remedies for Acidity : ‘हे’ पदार्थ ज्याने लगेच थांबेल अ‍ॅसिडिटीची समस्या, वाचा !
अ‍ॅसिडिटी
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 3:12 PM
Share

मुंबई : अ‍ॅसिडिटीची समस्या खूप सामान्य झाली आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना अ‍ॅसिडिटी होत आहे. मात्र अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी निरोगी जीवनशैली अवलंबणे आवश्यक आहे. यात आपल्याला योग्य वेळी खाणे, जेवण व्यवस्थित चघळणे, जेवणानंतर कमीतकमी अर्धा तास सरळ बसणे आणि नियमित व्यायाम इत्यादी गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त काही पदार्थ अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. (Special tips to overcome the problem of acidity)

ओवा – ओवा जठराशी संबंधित समस्या दूर करते आणि पाचन तंत्राला निरोगी ठेवते. त्यात थायमॉल असते. आपण चिमूटभर मीठ आणि ओवा चघळून खावा. तसेच रात्री एक ग्लास पाण्यात ओवा भिजवावा आणि सकाळी हे पाणी उपाशी पोटी प्यावे. यामुळे पोटासंदर्भातील समस्या दूर होण्यास मदत होते.

बडीशेप – जेवल्यानंतर आपण बडीशेप खातो. तसेच तोंडातून दुर्गंधी दूर करण्यासाठी बडीशेपचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त हे तुमची पाचक प्रणाली निरोगी ठेवते. रात्री बडीशेप पाण्यात भिजू घाला आणि सकाळी खा. यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. शिवाय चहामध्ये देखील बडीशेप घातली पाहिजे.

दूध आणि दही – अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी दूध हा एक चांगला उपाय आहे. थंड किंवा सौम्य तापवलेल्या दुधामुळे अ‍ॅसिडिटीमधून त्वरित आराम मिळतो. दूध एक नैसर्गिक अँटासिड आहे. हे नैसर्गिकरित्या अॅसिड कमी करते. अ‍ॅसिडिटी नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे दही, हे एक नैसर्गिक प्रोबियोटिक आहे.

मध – संशोधनानुसार कोमट पाण्यात एक चमचा मध घेतल्यास अ‍ॅसिडिटीमध्ये आराम मिळतो. त्यात थोडेसे लिंबू घालून, ते एक चांगले अल्कलाइझिंग एजंट बनते. जे पोटातील आम्ल काढून टाकते. यासाठी जेंव्हा आपल्याला अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो त्यावेळी हे पेय आपण पिले पाहिजे.

धने – धने अ‍ॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी आपल्याला धने पाण्यामध्ये भिजू घालावे लागतील. त्यानंतर हे पाणी प्या, यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होईल.

मेथी – अ‍ॅसिडिटीच्या समस्येवर मेथीचे दाणे देखील एक अतिशय प्रभावी उपाय आहे. जेंव्हा आपली अ‍ॅसिडिटी वाढते. त्यावेळी चार ते पाच मेथीची दाने चघळा यामुळे अ‍ॅसिडिटी कमी होते.

जिरे – अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर एक चमचा जिरं आणि ओवा तव्यावर हलकं भाजून घ्या. थंड झाल्यावर अर्धा चमचा साखरेसोबत याला खा. यानंतर 10 मिनिटांनी पाणी प्या.

लिंबू पाणी – लिंबू पाण्यात थोडी साखर टाकून प्यायल्यामुळे अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Special tips to overcome the problem of acidity)

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.