AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Curry Leaves |  हृदय विकाराचा धोका कमी करेल ‘कढीपत्त्याचे पान’, वाचा याच्या आणखी फायद्यांबद्दल…

कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी करतात. चवीसाठी तर याचा वापर होतोच; परंतु त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात.

Curry Leaves |  हृदय विकाराचा धोका कमी करेल ‘कढीपत्त्याचे पान’, वाचा याच्या आणखी फायद्यांबद्दल...
कढीपत्त्याची पाने
| Updated on: Feb 25, 2021 | 11:59 AM
Share

मुंबई : कढीपत्ता वा कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग जेवणाची चव वाढविण्यासाठी करतात. चवीसाठी तर याचा वापर होतोच; परंतु त्याचबरोबर कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो (Health And medicinal benefits of curry leaves).

कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. घरात सहज उपलब्ध असणारा आणि बाजारातही अगदी कमी किंमतीत मिळणारा कढीपत्ता आरोग्यासाठी नेमका कसा फायदेशीर ठरतो पाहूयात…

कढीपत्त्याचे फायदे :

वजन कमी करण्यासाठी

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर दररोज कढीपत्ता उकळवून प्या. यासाठी एका कप पाण्यात 10 ते 20 कढीपत्ता मिक्स करुन उकळवा. त्यात चवीनुसार मध आणि लिंबाचा रस घाला.

तोंडाचा अल्सर

वारंवार तोंडाचे फोड येत असल्यास कढीपत्त्यामध्ये मध मिसळून त्याची पेस्ट बनवा. हे मिश्रण तोंडाच्या अल्सरवर लावल्यास 2-3 दिवसात आराम मिळेल.

मधुमेह आणि कोलेस्टेरॉल कमी करते

कढीपत्त्यात असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. या व्यतिरिक्त हे पाचन तंत्रास देखील बळकट करते. ज्यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल जमा होत नाही. कढीपत्त्याचे सेवन केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका कमी होतो. यासाठी दररोज 8 ते 10 कढीपत्ता किंवा रस प्या. याशिवाय कढीपत्ता आमटी, भात आणि सलाडमध्ये मिसळून खाऊ शकता (Health And medicinal benefits of curry leaves).

केस गळती

बहुतेक लोकांना गडद आणि दाट केस आवडतात. परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे, केस गळणे ही समस्या सामान्य झाले आहे. जर, आपल्यालाही केस गळून पडण्याची समस्या उद्भवत असेल, तर नारळ तेलात कढीपत्ता आणि आवळा घाला. तेलाचा रंग काळा होईपर्यंत हे तेल मिश्रण उकळवा. थंड झाल्यावर स्काल्प आणि केसांच्या मुळांवर हे तेल लावा. दुसर्‍या दिवशी केस स्वच्छ धुवा.

कढीपत्त्याचे इतर फायदे :

– कढीपत्त्याच्या पानांमध्ये पालक, मेथी, कोिथबीर या भाज्यापेक्षा ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. तसेच इतर भाज्यांपेक्षा या पानांमध्ये कर्बोदके आणि प्रथिनांचे प्रमाण साधारणत: दुप्पट असते.

– लघवीला जळजळ होऊन थेंब थेंब होत असेल तर अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांच्या रसामध्ये सुती कापडाच्या घडय़ा बुडवून ओटीपोटावर ठेवाव्यात. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.

– कढीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहेत. या पानांच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)

(Health And medicinal benefits of curry leaves)

हेही वाचा :

Beauty Tips | काजळ लावताना ते पसरण्याची भीती वाटतेय? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!

Tea Benefits | आरोग्यासाठी अतिशय गुणकारी ठरू शकतो चहा, फक्त त्यात मिसळा ‘हा’ घटक!

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.