Health Care Tips | तुम्ही शरीराच्या या समस्यांनी ग्रस्त असाल तर चुकूनही दुधाचे सेवन करू नका!

Health Care Tips | तुम्ही शरीराच्या या समस्यांनी ग्रस्त असाल तर चुकूनही दुधाचे सेवन करू नका!
Image Credit source: unsplash.com

जर एखाद्या व्यक्तीला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्याने दुधाचे सेवन करू नका. तसेच ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनीही चुकूनही दुधाचे सेवन करू नये. जर तुम्हाला दूध प्यायला खूप आवडत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि नंतर प्या. कारण बद्धकोष्ठतेच्या रूग्णांनी दुधाचे सेवन केले तर समस्या अधिक गंभीर बनू शकते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 22, 2022 | 10:08 AM

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, दूध (Milk) पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायेदशीर आहे. दुधाच्या सेवनाने आपण आरोग्याच्या अनेक समस्या सहज दूर ठेऊ शकतो. तसेच दुधापासून तयार होणाऱ्या अनेक पदार्थांचे सेवन देखील करू शकतो. बऱ्याच लोकांना कच्चे दूध पिण्याची सवय असते. मात्र, कधीही दूध हे गरम आणि उकळूनच प्यावे. लहानपणापासूनच मुलांना त्यांच्या शरीरात (Body) पोषक तत्वांची कमतरता भासू नये आणि त्यांची हाडे मजबूत व्हावीत म्हणून त्यांना दूध पाजले जाते. कारण दूध शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यास मदत करते. हाडांसोबतच दुधामुळे दातही मजबूत होतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते शरीरात काही आरोग्यविषयक (Health) समस्या असल्यास दूध न पिणेच फायदेशीर ठरते. या आरोग्य समस्या नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

बद्धकोष्ठता

जर एखाद्या व्यक्तीला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर त्याने दुधाचे सेवन करू नका. तसेच ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनीही चुकूनही दुधाचे सेवन करू नये. जर तुम्हाला दूध प्यायला खूप आवडत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा आणि नंतर प्या. कारण बद्धकोष्ठतेच्या रूग्णांनी दुधाचे सेवन केले तर समस्या अधिक गंभीर बनू शकते. किंवा बद्धकोष्ठतेच्या रूग्णांनी गरमऐवजी थंड दुधाचे सेवन करावे.

अंगावर सूज

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बऱ्याच लोकांना अंगावर सूज येण्याची समस्या असते. अशांनी दुधाचे अजिबात सेवन करू नये. दुधामध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट शरीरात सूज वाढवते. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, दूध शरीरातील सूज वाढवण्यासोबतच चेहऱ्यावरील मुरूमांची समस्या देखील वाढवते. यामुळे ज्यांना अंगावर सूज येण्याची आणि मुरूम येण्याची समस्या आहे, अशांनी अजिबात दुधाचे सेवन करू नये.

हे सुद्धा वाचा

लिव्हर

एखाद्याला जर लिव्हर संदर्भात काही समस्या असेल तर त्यांनी दुधाचे सेवन करणे टाळले पाहिजे. चुकीचा आहार आणि खराब जीवनशैली यामुळे लिव्हर संदर्भात समस्या निर्माण होतात. पण जर तुम्हाला फॅटी लिव्हरची समस्या असेल तर अशा स्थितीत दूध पिऊ नका. बऱ्याच लोकांना असे वाटते की, लिव्हरच्या समस्येमध्ये दुधाचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. मात्र, हे चूक आहे. (वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें