Sabja Seeds : झटपट वजन कमी करण्यासाठी आहारात सब्जाचा समावेश करा!

सब्जा आयुर्वेदिक औषधांमध्ये महत्वाची भूमिका बजावते. ते उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, तणाव, टाइप 2 मधुमेह आणि चयापचय असंतुलन यासारख्या परिस्थितीमध्ये आराम देते. या बियामध्ये भरपूर फायबर असते. सब्जा आहारात घेतल्यामुळे बऱ्याच वेळ भूकही लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

Sabja Seeds : झटपट वजन कमी करण्यासाठी आहारात सब्जाचा समावेश करा!
सब्जा

मुंबई : सब्जा हे अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ओळखले जाते. सब्जामध्ये प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यात फायबरही भरपूर असते. सब्जा पाण्यात भिजवून खाल्ला जातो. सब्जामध्ये कॅलरीज नसतात. वजन कमी करण्यासाठी आणि इतर अनेक आरोग्य फायद्यांसाठी तुम्ही सब्जा आहारात समाविष्ट करू शकतात. (Include Sabja Seeds in the diet for weight loss)

सब्जाचे फायदे

वजन कमी करण्यास मदत करते

सब्जा आयुर्वेदिक औषधांमध्ये महत्वाची भूमिका बजावते. ते उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, तणाव, टाइप 2 मधुमेह आणि चयापचय असंतुलन यासारख्या परिस्थितीमध्ये आराम देते. या बियामध्ये भरपूर फायबर असते. सब्जा आहारात घेतल्यामुळे बऱ्याच वेळ भूकही लागत नाही. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

सब्जामध्ये कॅलरीज कमी असतात आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह, फॉस्फरससह मल्टीविटामिनसह पोषक असतात. ते अल्फा-लिनोलेनिक अॅसिडमध्ये देखील समृद्ध आहे. जे चरबी बर्न आणि चयापचय गतिमान करण्यास मदत करते. एका अभ्यासानुसार असे दिसून येते की, दररोज लिनोलेनिक अॅसिडचे सेवन केल्याने वजन कमी होते. म्हणून, वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारामध्ये सब्जाचा समावेश करा.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते

सब्जा खाल्ल्याने पाचन तंत्र चांगले कार्य करते. टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हे चांगले मानले जाते.

बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते

सब्जा तुमच्या शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते. हे आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमधून गॅस काढून टाकण्यास मदत करते आणि पोट साफ करण्याचे काम करते.

छातीतील जळजळ दूर करते

सब्जा शरीरातील एचसीएलचा अम्लीय प्रभाव कमी करते. यामुळे अॅसिडिटी आणि छातीत जळजळ पासून आराम मिळू शकतो. पाण्यात भिजवलेला सब्जा सेवन केल्याने पोट शांत होते आणि जळजळ दूर होते.

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

सब्जा नारळाच्या तेलात मिसळून त्वचेवर लावा. यामुळे त्वचा रोग दूर होण्यास मदत होते. ते नियमितपणे खाल्ल्याने तुमच्या शरीराला कोलेजन तयार होण्यास मदत होते. त्वचेच्या नवीन पेशींच्या निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. सब्जा निरोगी केसांसाठी फायदेशीर आहे. कारण त्यात लोह, व्हिटॅमिन के आणि प्रथिने असतात. जे लांब आणि मजबूत केसांसाठी आवश्यक असतात. त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Include Sabja Seeds in the diet for weight loss)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI